Home > Latest news > *राजवाडी तांड्याजवळ व्यापार्यांच्या टेम्पो चा आपघात ३ ठार ७ जखमी*

*राजवाडी तांड्याजवळ व्यापार्यांच्या टेम्पो चा आपघात ३ ठार ७ जखमी*

*3 killed and 7 injured in an accident involving a merchant's tempo near Rajwadi Tandya*

ब्रेकिंग न्यूज

*राजवाडी तांड्याजवळ व्यापार्यांच्या टेम्पो चा आपघात ३ ठार ७ जखमी*

भोकर/प्रतिनिधी गजानन गाडेकर

तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजाराठी हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन व्यवसायिकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला व अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 3 ठार तर 07 जण जखमी झाले असून, जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांचे प्रेत शासकीय रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी हलवण्यात आले आहे.

अपघातात मयत झालेल्यामध्ये म. हाफीजम. हुसेन, म रफीक म. आमिनसाब, म. चांद म. मिरासाब यांचा समावेश आहे. तर जखमींवर मुदखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान किरकोळ भाजीपाला व्यावसायिक असणारे हे सर्वजण आज हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी जात होते. मयत व जखमी सर्व आठवडी बाजाराचे किरकोळ व्यापारी होते. हिमायतनगरच्या बाजारासाठी जात असताना खड्डयांमुळे राजवाडी तांडा जवळ हा अपघात झाला. अधिक तपास चालू आहे

Updated : 22 Sep 2022 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top