द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचा जि.प.नांदेड च्या वतीने सन्मान....!!!
Honoring Sadguru Sainath Maharaj Vasmatkar on behalf of District Nanded...!!!
X
माहूर/नांदेड.
माहूर येथील श्री.आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती सद्गुरू द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय सेवा कार्यासाठी जिल्हा परिषद नांदेड च्या शिक्षण विभागाने सन्मानित केले आहे.
दि.02/03/2023 ला एका सोहळ्या निमित्ताने महाराजांच्या किर्तन सेवेच्या कार्यक्रमात जि.प.नांदेड च्या शिक्षण विभागाच्या वतीने पंचायत समिती माहूर चे गटशिक्षणाधिकारी आर.आर.जाधव यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्रीमती वर्षा ठाकूर घुगे व जि.प.शिक्षणाधिकारी(प्रा.) सौ. सविता बिरगे यांच्या स्वाक्षरीचे 'मानव सेवा' हे प्रमाणपत्र देऊन महाराजांना गौरवण्यात आले.
नेहमीच श्री.आनंद दत्तधाम आश्रमाच्या वतीने समाजातील विविध घटकांना मदतीचा हात दिला गेला आहे.विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्या अनेक उपक्रमांतून आश्रम सतत सामाजिक स्थैर्य,समाज प्रबोधन,तसेच आरोग्य,स्वच्छता आणि शिक्षणासाठी सातत्याने नि:शुल्क व कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य करत आले आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे सद्गुरू द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांना जाते.
आजवर निरंतर शासकीय दवाखाना माहूरला सकाळ-संध्याकाळ श्री आनंद दत्तधाम आश्रमातून जेवनाचे डबे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत पुरवले जातात.कोरोना काळात जाणीव जागृती बरोबरच वंचितांना धान्य वाटप असो किंवा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लसीकरण व रक्तदान शिबिरे असो त्याचप्रमाणे स्वच्छता शिबिरे असोत किंवा शिक्षण परिषदेचे आयोजन असो या कार्यात महाराजांचे कार्य भरीव आहे.
नुकत्याच माहूर शासकीय निवासी आश्रम शाळेत तालुक्यातील शेकडो शाळांतील शिष्यवृत्ती परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवशीय शिबीराचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती माहूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या निवासी शिबारातील विद्यार्थी-शिक्षक व मार्गदर्शकांसाठी अगदी दहा दिवस आश्रमाच्या वतीने नास्ता,दुपारच्या व संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था अत्यंत दर्जेदार पद्धतीने महाराजांनी केली.आणि तमाम विद्यार्थ्यांना त्यांच्या आशिर्वादाचा लाभ झाला.
दरवर्षी शिक्षण परिषद आणि अशा प्रकारच्या शैक्षणिक मदतीसाठी जि.प.नांदेडने दखल घेऊन दि.02/03/2023 च्या एका किर्तन सोहळ्यात माहूर पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी आर.आर.जाधव,म.रा.शिक्षक परिषद माहूर चे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील,संतोष गंधे, बालाजी येरमे,सुधीर जाधव,भाग्यवान भवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर व असंख्य अनुयायांच्या सक्षम द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर तथा वसमतकर यांचा यथोचित सन्मान केला.