Home > Lifestyle > Health > सर्पमित्र हरिष कापसे ने दिले चक्क तीन हजार च्या वर सापांना जीवदान

सर्पमित्र हरिष कापसे ने दिले चक्क तीन हजार च्या वर सापांना जीवदान

Snake lover Harish Kapse gave life to more than three thousand snakes

सर्पमित्र हरिष कापसे ने दिले चक्क तीन हजार च्या वर सापांना जीवदान
X

- मारेगाव येथे साडेपाच फुटाच्या घोणसला मोठ्या शिताफीने पकडला

- अनेक वर्षा पासुन देत आहे मोफत सेवा

दिलदार शेख, मारेगाव:- साप समोर दिसताच अनेकांच्या अंगाला शहारा आल्या शिवाय राहत नाही. परंतु या सर्पमित्राच्या हिमतीला तर नक्कीच दाद द्यावी लागेल. या सर्प मित्राने एक नव्हे, शंभर नव्हे तर आजपर्यंत चक्क तीन हजार च्या वर सापांना जीवदान दिले. व त्यांना वणी मारेगाव परीसरातील जंगलात सुखरूप सोडले.अश्यातच मारेगाव शहरातील पवन मलकापुरे यांचे राहते घरातुन अडचणींचा सामना करत चक्क साडेपाच फुटाचा घोणस जातीचा विषारी जहाल साप मोठ्या शिताफीने पकडला. हरिष कापसे रा.वणी असे या सर्पमित्राने नाव आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडण्याची मोफत सेवा देत आहे.

मार्च एप्रिल व मे या तीन महिन्याचा कालावधी हा सापांचा "मिलन काळ" असतो. त्यामुळे या कालावधीत रोजच अनेकांच्या शेतात, घरात साप आढळतो. अश्यातच मारेगाव शहरातील प्रभाग क्र. ५ मधील पवन मलकापुरे यांचे राहते घरी चक्क साडेपाच फुटाचा महाकाय घोणस साप आढळला. यामुळे कुटूंबियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अश्यातच वणी येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र हरिष कापसे यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र हरिष यांनी कुठलाच विलंब न करता मलकापुरे यांचे घर गाठत मोठ्या अडचणीचा सामना करत त्या साडेपाच फुटाच्या घोणस सापला मोठ्या शिताफीने पकडला. तेव्हाच मलकापुरे कुटूंबियांनी सुटकेचा स्वास घेतला.

सपर्पमित्र हरिष कापसे यांनी वणी मारेगाव परिसरात आज परंत चक्क नाग, घोणस, मण्यार, अजगर, धुरका, घोणस फुरशी, धामण, कुकरी, तस्कर वेल्या, केवढ्या सारख्या विषारी तीन हजार च्या वर सापांना पकडून त्यांना जीवदान दिले तर हजारो नागरिकांचे प्राण वाचवले. तर या २०२३ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान त्याने १७२ सापांना पकडून जीवदान दिले आहे. सर्पमित्र हरिष कापसे हे गेल्या अनेक वर्षापासून साप पकडण्याची मोफत सेवा वणी मारेगाव परिसरातील नागरिकांना देत असल्याने त्यांच्या या महान कार्याला हजारो नागरिक दाद देत आहे.

Updated : 18 March 2023 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top