आजकाल सोशल मीडियाच स्टार ठरवते- वैशाली माडे
Nowadays only social media decides the star- Vaishali Made
X
आजकाल सोशल मीडियाच स्टार ठरवते- वैशाली माडे
यवतमाळ,
कित्येक चांगली गाणी आहे. त्यावर मात्र, सोशल मिडियावर पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. तर डान्स करण्यासार'या गाण्यावर भरमसाठ प्रतिसाद मिळतो.त्यामुळे आजकाल सोशल मिडियाच स्टार कोण आहे, हे ठरवत असल्याची खंत सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी शुक'वार, 8 एप्रिल रोजी झालेल्या पत्रपरिषदेत बोलून दाखवली.
यवतमाळ येथे समतापर्व 2022 च्या आयोजित कार्यक'मासाठी त्या यवतमाळात आल्या होत्या. याप्रसंगी गायक आशिष कुळकर्णी, समतापर्व 2022 चे अध्यक्ष अॅड. रामदास राऊत, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, अंकुश वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना वैशाली माडे म्हणाल्या, लोकांची आवड आता बदलत आहे. सोशल मिडियाच्या काही सेकंदाच्या व्हिडिओला लाखो लोक पाहतात. यातही ज्या गाण्यावर नृत्य करण्यासारखे आहे त्याला अधिक पसंती आहे. कित्येक चांगली व अर्थपूर्ण गाणीसुद्धा आहेत. मात्र, त्या गाण्यांना पाहिजे तसा सोशल मिडियावर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सोशल मिडियाच आजचा स्टार ठरवत आहे, ही खंतच आहे. त्याचबरोबर गायक आशिष कुळकर्णी यांनी सांगितले, माझी काही गाणी लवकरच येणार आहेत. त्याचसोबत आता संगीतकार म्हणूनसुद्धा काम करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.