Home > Fashion > हर्षा शिंदे ,सौ. गौरी थोरात व शीतल पाटिल ठरल्या मिस व मिसेस हेरिटेज इंडियाच्या विजेत्या

हर्षा शिंदे ,सौ. गौरी थोरात व शीतल पाटिल ठरल्या मिस व मिसेस हेरिटेज इंडियाच्या विजेत्या

Harsha Shinde, Sou. Gauri Thorat and Sheetal Patil were the winners of Miss and Mrs Heritage India

हर्षा शिंदे ,सौ. गौरी थोरात व शीतल पाटिल ठरल्या मिस व मिसेस हेरिटेज इंडियाच्या विजेत्या
X

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमांगी कवी यांच्या हस्ते क्राऊन (मुकुट) घालून विजेत्यांचा गौरव

सांस्कृतिक वारसा जपण्याच्या जागतिक स्पर्धेत भारताचे करणार प्रतिनिधित्व

----------------------------------------------------------

ममराठी डिजीटल टीम,पुणे

Publish Date Sat,28 August

1:50 pm,last

Edited By:तानाजी कांबळे

----------------------------------------------------------

पुणे (प्रतिनिधी) ---- : मृणाल एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस हेरिटेज इंडिया व मिसेस हेरिटेज इंडिया या अनोख्या स्पर्धेत मिस हेरिटेज स्पर्धेत हर्षा शिंदे ही विजेती ठरली असून मिसेस हेरिटेज इंडिया स्पर्धेच्या सौ. गौरी थोरात या विजेत्या ठरल्या आहेत.


विजेत्यांना सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमांगी कवी यांच्या हस्ते मुकुट घालून सन्मानित करण्यात आले.


पुण्याच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये हा रंगारंग कार्यक्रम झाला. श्रीमती मृणाल गायकवाड यांनी त्यांच्या मृणाल एंटरटेनमेंटच्या वतीने भारतातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या अनोख्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देशभरातून 17 जणींनी सहभाग घेतला होता.


त्यातील मिस हेरिटेज इंडिया मध्ये हर्षा शिंदे विजेत्या तर सायली काळे (फर्स्ट रनर अप) व माधुरी लोखंडे (सेकंड रनर अप) त्यानंतर मिसेस हेरिटेज इंडियाच्या सौ. गौरी थोरात विजेत्या तर अमृता कुराने (फर्स्ट रनर अप) व सौ. प्रियांका शिंदे (सेकंड रनर अप) ठरल्या


त्याचबरोबर श्रीमती हेरिटेज इंडिया क्लासिक या स्पर्धेत शीतल पाटील विजेत्या तर मोनिका खैलानी (फर्स्ट रनर अप) व वर्षा भास्कर (सेकंड रनर अप) ठरल्या आहेत.


या समारंभास सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी यांच्यासह मेघराज राजे भोसले, संदीप मोहिते पाटील, अंजनेय साठे, सुनीता मोडक, विजया मानमोड़े, अमितराजे गायकवाड, प्रशांत जोशी, अजित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


या स्पर्धेसाठी आरती बलेरी, पूनम शेंडे, मयुरेश डहाके, डॉ. गौरी चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच वैशाली भगोडीया यांनी मेक अप पार्टनर म्हणून सहाय्य केले.


सूत्रसंचालन सेलिब्रिटी सिमरन अहूजा यानी केले.






Updated : 28 Aug 2021 9:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top