Home > Fashion > लाडखेड सोसाटीवर शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय..

लाडखेड सोसाटीवर शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय..

Farmer Development Panel's resounding victory over Ladkhed Society.

लाडखेड सोसाटीवर शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय..
X

लाडखेड-दारव्हा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या व राजकीय दृष्ट्या अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लाडखेड ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक फार अटीतटीची ठरली. यात मतदारांनी पूर्णतः विश्वास दाखवून शेतकरी विकास पॅनलच्या १३ ही उमेदवारांना मतदान करून भरगच्च मताधिक्याने निवडून देत विरोधी गटाची धोबीपछाड करीत पराभव केला.

संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लाडखेड सोसायटीवर आपली सत्ता बसावी यासाठी दिग्गज नेते कामी लागले होते. मात्र शेतकरी विकास पॅनल ने केवळ शेतकर्यांना न्याय कसा मिळेल. या मुद्द्यांवर निवडणूक लढविली यात १३ पैकी १३ ही उमेदवार विजयी ठरले यात विरोधी गटाला खाते ही उघडता आले नाही. यात रहेमान खान बिस्मिल्ला खान, देवानंद शामराव निमकर, गजानन भिकाजी दातीर, ज्ञानेश्वर श्रीकांत दुधे, शशांक रामचंद्र दुधे, अनिल भगवान दुधे, सुलेमान खान रहेमान खान, सुलतानखान अब्दारखान पठाण, विलास पुंडलिक दुधे, दिनेश शामराव सिंखोपडे, खुशाल किसन पाचखंडे, सौ. संगीता भगवान दुधे, श्रीमती सुनिता राजू कसंबे इत्यादी उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. श्री किसनराव दुधे,यांच्या नेतृत्वात सुभाष दुधे, प्रदीप गुल्हाने, दिनेश कदम, दिपक बाहेकर, प्रभाकर गुल्हाने,राहुल असवार,माणिक अरू, रमेश बागोकार, शयरोदिन काजी,रेवनाथ गारोडी,आकाश दुधे, मंगेश भिसनकार, मनोज खोडे, दानिश खान,मनोज तायडे, महमंद खान, विजय चिरडे अब्दुल वहीद,अडोकेट गजानन केळकर,पत्रकार, सुनिल नागापुरे, सनी खान, प्रदीप मेश्राम,आदींनी मोलाचे सहकार्य करीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणले. निवडणूक निर्णय अधिकारी बी,जी,जाधव यांच्या हस्ते पॅनल चे प्रतिनिधि अन्सार खान,प्रेमचंद दुधे,यांनी उमेदवार विजयी झाल्या चे प्रमाणपत्र स्वीकारले या निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे , पो,हे कॉ,उमेश चन्दन,रणजीत गुरनुले,यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या निवडीने विजयी उमेदवारांचे कौतुक करून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Updated : 17 April 2022 9:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top