सौंदर्य स्पर्धेत डॉ. अंजली गवार्ले विजयी
Beauty pageant Dr. Anjali Gawarle wins
X
पुणे - पुणे येथे आयोजित एका सौंदर्य स्पर्धेत यवतमळच्या सुप्रसिद्ध डॉ. अंजली गवार्ले या विजयी झाल्या. 7 ऑगस्ट ग्रीन सिटी सिंहगड रोड पुणे, सिद्धी प्रोडक्शन तर्फे मिस, मिसेस इंडिया फॅशन स्टार 2022 सौंदर्य स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन सिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष समीर खिरीड यांनी केले. शो डायरेक्टर प्रियांका मोरे व ग्रुमर व कोरिओग्राफर रेशमा पाटील होत्या. जुरी - नरेश फुलेल्लू, झाहिरा शेख, अतुल गुंजाळ यांनी काम पाहिले. प्रमुख अतिथी मिसेस इंडिया ग्लॅमर दीपाक्षी मिसेस, मिसेस जयपूर, अर्चना शेफर्, नाटकब्रँड, नमामि ब्रँड मिसेस श्रद्धा गुप्ता लाभल्या. शेफेर,शो चे निवेदन आर जे बंड्या यांनी केले.
रणरागिणी पहिल्या महिला बाउन्सर सिक्युरिटी ग्रुप च्या दीपा परब व ललिता शिरोळे कार्यक्रमाला बहुमूल्य सहकार्य केले. सौंदर्य स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे प्लॅटिनम मिसेस विनर - डॉ. अंजली गवार्ले, गोल्ड मिसेस विनर - शुभांगी तरस, सिल्व्हर मिसेस विनर - कविता गाडेकर, क्लासिक मिसेस विनर - नीलिमा अवसरमल, मिस गटाच्या विजेत्या - अनुष्का सामाने, मिस गट उपविजेत्या - प्रसिद्धी पोटे, मिस तसेच मिसेस इंडिया स्टार डामोंड यामध्ये, पुणे, नागपूर, मुंबई, अहमदनगर, नाशिक, सुरत, बंगलोर, येथील सर्व स्पर्धक सहभागी होते. या शो च्या विजेत्या ठरलेल्या डॉ. अंजली गवार्ले अनोरेक्टल सर्जन आहेत, त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.