यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या कीर्तीवंत.
डॉ. सुमेध मिलिंद जाधव चा समाजरुपी हृदयस्पर्शी सत्कार!
X
यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या कीर्तीवंत.............
डॉ. सुमेध मिलिंद जाधव चा समाजरुपी हृदयस्पर्शी सत्कार!
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी ही परीक्षा असून देशपातळीवर या परीक्षा घेतल्या जातात यामध्ये आपल्या पुष्पावंती नगरीचे सुपुत्र डॉ. सुमेध मिलिंद जाधव यांनी देशातून 687 वी रँक मिळून यश संपादित केले आहे.
त्यामुळे त्याच्या यशस्वी कर्तुत्वाचा पुसद परिसरातील सर्वपक्ष, विविध संघटना, समाजसेवी संघटना,सामाजिक पदाधिकारी तथा कार्यकर्ता अशा सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
समता नगर पुसद येथील मिलिंद जाधव सर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत त्यांचे राहते घरी,सुमेध व त्यांचे आई वडील तसेच जाधव कुटुंबीय यांचा यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन समाजरूपी हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.
व पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष,आयु.बुद्धरत्न भालेराव,रिपब्लिकन वार्ता न्यूज चैनल चे विदर्भ उपसंपादक,तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी आयु.राजेश ढोले शहराध्यक्ष, जयानंद उबाळे, आयु. कैलास श्रावणे, राजरत्न लोखंडे, डॉ. अरुण राऊत.इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.