Home > About Us... > अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या...‼️

अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या...‼️

Know 'these' things about Atal Bihari Vajpayee...‼️

ज़ाकिर हुसैन - 9421302699

म मराठी स्पेशल‼️ दिनविशेष

भारताचे माजी पंतप्रधान तसेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालियर येथे झाला. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये भारतात खूप मोठ-मोठे बदल घडवून आणले.

भारताच्या विकासामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांची पुण्यतीथी आहे. या पार्श्वभूमीवरच अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत.

लहानपणापासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाले. त्यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषेचे आणि साहित्याचे प्राध्यापक होते.

वाजपेयी हे भारतीय जनता संघाचे संस्थापक श्याम प्रसाद मुखर्जी यांचे निकटवर्ती आणि सहकारी होते.

🔰 श्याम मुखर्जी यांच्याकडून बॅटन घेऊन 1957 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.

🔰 अटल बिहारी वाजपेयी हे कॉंग्रेस पक्षाव्यतिरिक्त पहिल्या सरकारचे प्रमुख बनले आणि त्यांना पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला होता.

🔰अटलजींचा स्वभाव शांत होता. त्यांना कोणी कधी रागात असलेलं पाहिले नव्हतं. ते त्यांच्यासोबत काम करणाऱ्यावर कधी रागावत नसत.

🔰 पण जे त्यांच्या जवळचे होते त्याना अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे की, काही तरी चुकलंय किंवा त्यांना काहीतरी आवडले नाही.

🔰 1996 साली अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्याच्या चार दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेस-विरोधी पक्षाचे पंतप्रधान बनले. याआधी बहुतेक सर्व पंतप्रधान हे कॉंग्रेसचे किंवा काँग्रेस समर्थनाचे होते.

🔰 ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीत भाषण केले. या आधी कोणीही तिथे हिंदीमध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.

🔰 अटल बिहारी वाजपेयी यांनी1999 मध्ये पुन्हा एकदा पुनर्रचना केली आणि यावेळी एका स्थिर युतीने पूर्ण काळासाठी निवडून आले.

🔰 ते नेहमी धाडसी निर्णय घेत असत. त्यांच्या कार्यकाळात 11 मे 1998 रोजी भारताने पोखरणची अणुचाचणी केली होती. यामुळे विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध देखील लादले होते.

🔰 वाजपेयी यांना 1992 रोजी पद्मविभूषण, 1994 साली लोकमान्य टिळक पुरस्कार तसेच उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार आणि 2014 मध्ये भारतरत्न या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत।

Updated : 2022-08-17T00:18:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top