अंबा नगर परिसरात युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला
Youth stabbed to death in Amba Nagar area
X
यवतमाळ -: शहरातील दारव्हा रोड वर असलेल्या अंबा नगर येथे मदीना बॅटरी समोर एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 1 जानेवारी रोजी साडेपाच वाजता च्या सुमारास घडली.
नेताजी नगरातील कन्हैया जंगलु हातागडे हा नेताजी नगर परिसरात सुरू असलेल्या कॅरम जवळ उभा असता या कारणावरून वाद करुन जीवे मारण्याची धमकी देऊन कन्यैया हातागडे याला त्या ठिकाणाहून हाकलून दिले.परत सायंकाळी कन्हैया हा मदीना बॅटरीच्या बाजुला असलेल्या देशी दारूच्या दुकानावर दारू पिण्याकरिता गेला असता आरोपी नीलेश मनवर वय ३० वर्ष रा.वैशाली नगर अधिक एक जण यांनी संगनमत करून कन्हैया सोबत वाद करून शिवीगाळ केली व हातातील चाकूने कन्हैयाच्या मांडीवर मारून जखमी केले.याप्रकरणी जयसिंग जंगलु हाताकडे वय ४५ वर्ष राहणार नेताजी नगर लाटी वाला पेट्रोल पंप समोर याच्या तक्रारीवरून अवधूत वाडी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध भादवि कलम 324,504,506,34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.