Home > Crime news > दरा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या..

दरा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या..

Youth from Dara commits suicide by consuming poison

झरी प्रतिनिधी निलेश भोयर

कायर येथे कृषी केंद्रात काम करणाऱ्या कामगाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.17 डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. ऋषिकेश गजानन क्षीरसागर (20) रा. दरा ता. झरी असे आत्महत्या करणा-या कामगारांचे नाव आहे.

ऋषिकेश हा कायर येथील कृषी केंद्रात गेल्या अनेक महिन्यापासून काम करत होता. कृषी केंद्र संचालकाची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे ऋषिकेश हा कृषी केंद्राचा व्यवसाय पाहत होता.

संध्याकाळी कृषी केंद्र बंद करण्याच्या वेळी दुकानात ऋषिकेश आढळून आला नाही. कृषी केंद्राच्या शेजारीच कृषी केंद्राचे गोदाम आहे. ऋषिकेश तिथे गेला असावा म्हणून तिथे जाऊन शोधले असता त्या ठिकाणी ऋषिकेशने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवन्यात आला.आज दरा येथे ऋषिकेशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Updated : 18 Dec 2021 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top