Home > Crime news > दोन मर्डर ने हादरले यवतमाळ

दोन मर्डर ने हादरले यवतमाळ

Yavatmal shaken by two murders

दोन मर्डर ने हादरले यवतमाळ
X

दोन मर्डर ने हादरले यवतमाळ

यवतमाळ- शहरासह तालुक्यात दोन मर्डरच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यात पांढरकवडा मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळील गल्लीत तर दुसरी घटना यवतमाळ तालुक्यातील वाघाडी धरण परिसरात घडली. सुनील भीमराव निंबोरे वय ३५ वर्ष रा. येळाबारा असे मृत युवकाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेतील मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोन्ही प्रकरणातील मारेकरी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पांढरकवडा मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळील बोळीत शनिवारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, ठाणेदार नंदकुमार पंत यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. तालुक्यातील येळाबारा येथील सुनील निंबोरे रविवारी पत्नीला आणण्याकरता जातो, म्हणून घरून निघून गेले होते. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास वाघाडी धरणात एका युवकाचा पाय तरंगताना नागरिकांना आढळले. घटनेची माहिती नागरिकांनी तातडीने वडगाव जंगल पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस उपनिरिक्षक भास्कर दरणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाघाडी धरण गाठून पाहणी केली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळी तो मृतदेह येळाबारा येथील सुनील निंबोरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर मृत सुनील याचा गळा आवळून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करीत त्याच्या कमरेला ओढणीने आणि नायलॉन दोरीने वजनदार दगड बांधून मृतदेह धरणात फेकण्यात पोलिस तपासात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात अनिल निंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आला आहे.

Updated : 15 May 2022 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top