Home > Crime news > Yavatmal Crime: पुण्याला जात होती पत्नी, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पतीसह ४ आरोपींना अटक

Yavatmal Crime: पुण्याला जात होती पत्नी, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पतीसह ४ आरोपींना अटक

Yavatmal Crime: Wife on her way to Pune, decomposed body found, 4 accused including husband arrested

Yavatmal Crime: पुण्याला जात होती पत्नी, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, पतीसह ४ आरोपींना अटक
X

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. दरम्यान, घटनेचा उलगडा झाला असून कौटूंबिक वाद व स्थावर मालमत्तेसाठी पतीनेच पत्नीच्या खुनाचा कट रचून ठार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पुजा अनिल कावळे (28) रा. बाई गौळ ता. मानोरा जि. वाशिम असे मृत महिलेचे नाव आहे. ती पुणे येथे जाण्यासाठी निघाली. परंतु, पुणे येथे पोहचली नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान दिग्रस तालुक्यात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. उज्वल पंढरी नगराळे (22) रा. राळेगाव, गौरव रामभाऊ राऊत (21) रा. कळंब, अभिषेक चयन म्हात्रे (24) रा. शिंदी बु. ता. अचलपुर जि. अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि दिग्रस पोलिसांनी केला.

Updated : 22 Nov 2021 9:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top