Home > Crime news > वाशिम ग्रामीण पोलीसांची कारवाई; खुनाच्या गुन्हयाची २४ तासात उकल, मारेकरी मुलाला अटक

वाशिम ग्रामीण पोलीसांची कारवाई; खुनाच्या गुन्हयाची २४ तासात उकल, मारेकरी मुलाला अटक

Washim Rural Police action; नाच्या Murder case solved within 24 hours, killer son arrested

वाशिम ग्रामीण पोलीसांची कारवाई;    खुनाच्या गुन्हयाची २४ तासात उकल, मारेकरी मुलाला अटक
X

वाशिम ग्रामीण पोलीसांची कारवाई;

खुनाच्या गुन्हयाची २४ तासात उकल, मारेकरी मुलाला अटक

वाशिम:-दिनांक ०६/०५/२०२२ रोजीचे ते ०७/०५/२०२२ रोजीचे रात्री दरम्यान वाशिम ते केकतउमरा रोडवरील तामसाळा शेतशिवारातील दुर्गामाता संस्थान, मंदिरामध्ये मारोती भिकाजी पुंड, वय ५२ वर्ष, रा. केकत उमरा हे नेहमी प्रमाणे झोपले असता रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून मारोती पुंड यांचे पाठीमागुन डोक्यावर मारून जिवाने ठार मारले. अशा फिर्यादी मयताची पत्नी नामे पुंजाबाई मारोती पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध नं. १९४/२२ कलम ३०२ भादंवि गुन्हा नोंद करण्यात आला.

गंभीर स्वरूपाच्या गुन्हा घडल्याने मा. पोलीस अधीक्षक, वाशिम श्री. बच्चन सिंह, यांनी तात्काळ सहायक पोलीस अधीक्षक तथा ठाणेदार महेक स्वामी(भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पुजारी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव यांना तपासाबाबत सुचना देवुन 'तत्काळ घटनास्थळी रवाना केले. सदर गुन्हयाचे तपासात ,परिस्थतीजन्य पुराव्यावरून मयताचा मुलगा नामे गणेश मारोती पुंड, वय ३० वर्ष,केकतउमरा यास ताब्यात घेवुन सचोटी व कौशल्यपुर्णरित्या विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मयत हा आपल्या मुलाला नेहमी खालच्या स्तराची वागणुक देत होता. त्यामुळे दोघा बाप- -लेकात वाद होत होता. बापाचा राग मनात धरून मुलगा नामे गणेश मारोती पुंड, वय ३० वर्ष, रा. केकतउमरा याने त्यांचा खुन केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर आरोपीस अटक करण्यात आली असुन, तपासाच्या दृष्टीकोनातुन अधिक पुरावा गोळा सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तथा ठाणेदार महेक स्वामी(भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पुजारी, तपास अधिकारी सपोनि संजय मच्छले पो.स्टे. वाशिम ग्रामीण यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार यांनी केली.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 8 May 2022 8:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top