वाशिम पोलिसदलाची अवैध धंद्यावर धाड
८४६९० रूपयाची गावठी दारू जप्त
X
वाशिम पोलिसदलाची अवैध धंद्यावर धाड
८४६९० रूपयाची गावठी दारू जप्त
अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले
फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथे चार ठिकाणी गावठी हातभट्टिवर धाडी टाकुन ८४६९०/- रुपये किमतीची दारु जप्त करुन विविध कलमान्वये आरोपिंवर गुन्हे दाखल केले आहे.
वाशिम जिल्ह्याच्या पोलिस विभागाची धुरा हाती घेतल्यापासुन पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी अवैध धंदे काबूत आणले असुन गुन्हेगारांना वठणीवर आणले आहे.विविध सामाजिक ऊपक्रम राबवुन पोलिस विभागाची प्रतिमा जनमाणसात उंचावन्यासाठी सतत प्रयत्न केले तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठीही कसोशीने प्रयत्न केले आहे.पोलिसांना मीळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थागुशाचे शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात सापळा रचुन मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथे दि.१२ जुलै रोजी अवैध हातभट्टीवर छापेमारे केली.यामध्ये आरोपी इमाम बेनी बेनिवाले वय 45 वर्ष रा.शिवणी ता.मंगरुळपिर जि.वाशिम घटनास्थळ शिवणी, पो.स्टे मंगरुळपिर येथे 60 ली गा.भ.दारू की 12000/-, 300 ली सडवा मोहमाच की 30,000/- एकूण 42,000/- रु चा माल,तसेच आरोपी अलिम कासम बेनिवाले वय 26 वर्ष रा.शिवणी ता.मंगरुळपिर जि.वाशिम घटनास्थळ शिवणी , पो.स्टे मंगरुळपिर येथे 50 ली गा.भ.दारू की 10,500/-, 200 ली सडवा मोहमाच की 20,200/-,देशी दारू बॉबी संत्रा 90ml 230 नग की 6900/- एकूण 37,850/- रु व आरोपी नरेंद्र बबनराव चव्हाण वय 41 वर्ष रा.शिवणी ता.मंगरुळपिर जि.वाशिम घटनास्थळ- शिवणी, पो.स्टे मंगरुळपिर यांचेकडुन देशी दारू टँगो 28 नग किंमत 840/- रु चा माल आणी आरोपी रामदास सिताराम टाले वय 49 वर्ष रा.शिवणी ता.मंगरुळपिर जि.वाशिम घटनास्थळ- शिवणी पो.स्टे मंगरुळपिर यांचेकडुन 20 ली गा. ह.भ दारू कि.4000/- रु किमतीची गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन गुन्हा नोंद केला आहे.या छापेमारीत सपोउपनी नारायण जाधव, नापोका किशोर चिंचोळकर, अमोल इंगोले,पोका निलेश इंगळे,अश्विन जाधव, प्रविण राऊत, मपोका रेश्मा ठाकरे,चापोका गजानन जाधव यांनी मोलाची भुमिका बजावली.वाशिम जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरु असतील तर त्याविषयी तात्काळ पोलिस विभागाला कळवन्यात यावे असे आवाहन पोलिसांकडुन करन्यात आले आहे.
प्रतीनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206