ग्रामपंचायत निवडणुक संदर्भाने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारंजा शहरात धडाकेबाज कारवाई
Washim Local Crime Branch's action in Karanja city in connection with Gram Panchayat elections
X
ग्रामपंचायत निवडणुक संदर्भाने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारंजा शहरात धडाकेबाज कारवाई
७२५००/- रू. गावठी हातभटटीची दारू जप्त, ०४ इसमाविरूध्द गुन्हे दाखल
वाशिम(फुलचंद भगत)दिनांक १५.०१.२०२१ रोजी जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुक असल्याने दारू पिणारे लोकांकडुन उपद्रव होवु नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, याकरीता आज दिनांक १४.०१.२०२१ रोजी मा. पोलीस अधीक्षक, श्री. वसंत परदेशी व अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात सकाळी ०५.०० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, व दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी/अंमलदारांनी कारजा शहरातील गवळीपुरा भागात वेगवेगळया ठीकाणी छापे मारून पोलीस ठाणे कारजा शहर येथे ०४ इसमांविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हे नोंदविले.
आनंदनगर गवळीपुरा कारंजा भागात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभटटीची दारू गाळणा-या कारखाण्यावर छापा मारून अजीस खान रहेमान खान, रा. राहुलनगर कारंजा याचे ताब्यातुन ४०० लिटर सडवा मोहामाच, ३५ लिटर गावठी हातभटटीची दारू व दारू गाळण्यासाठी लागणारे इतर साहीत्य असा एकुण ५५,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.कासम कालु निनसुरवाले, रा. गवळीपुरा कारंजा याचे ताब्यातुन २० लिटर गावठी हातभटटीची दारू किंमत ४०००/- रू. ची जप्त करण्यात आली.गवळीपुरा कारंजा येथील जुने पोलीस चौकीमागील भागात छापा मारून अवैधरित्या गावठी हातभटटीची दारू विकणारा शे.ईरफान शेआमीर रा. मंगळवारा कारंजा याचे ताब्यातुन २५ लिटर गावठी हातभटटीची दारू किंमत ५०००/- रू. ची जप्त करण्यात आली.
ईस्माइल मदन गारवे, रा. गवळीपुरा कारजा याचे ताब्यातुन सडवा मोहामाच १५० लिटर व गावठी हातभटटीची दारू २० लिटर असा एकुण ८५००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.वरील चारही इसमांविरूध्द पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे दारूबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. सदरची कारवाई आज दिनांक १४.०१.२०२१ रोजी ०५.०० वा.पासुन ०९.०० वा. पर्यंत पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी ठाकरे याचे मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि शब्बीर पठाण, सपोउपनि भगवान गावंडे, नारायण जाधव, पोना किशोर चिंचोळकर,संतोष कंकाळ, मुकेश भगत, राजेश राठोड, सुनिल पवार, अमोल इंगोले, संतोष शेणकुडे, श्रीराम नागुलकर, निलेश इंगळे चालक मिलींद गायकवाड व श्याम इंगळे व दंगा नियंत्रण पथकातील अंमलदारांनी केली आहे.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206