दारूबंदी कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत वॉश आऊट मोहिम राबवुन गावठी मोहा दारुचे चालु भट्टयांवरती कार्यवाही
Wash out campaign under anti-alcohol combing operation
X
हिंगणघाट दि.०६
दारूबंदी कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत वॉश आऊट मोहिम राबवुन गावठी मोहा दारुचे चालु भट्टयांवरती कार्यवाही दि. 05 च्या पहाटे समुद्रपुर पोलिसांनी केली.
काल दि.५ रोजी मौजा गव्हा(कोल्ही) येथील पारधी बेड्यावर केलेल्या वॉश आऊट मोहीमे दरम्यान पारधी बेड्याचे बाजुला असणा-या शेतामध्ये गावठी मोहा दारुच्या भट्टयांचा शोध घेतला असता त्याठिकाणी 05 महिला आरोपी अवैधरित्या गावठी मोहा दारुची चालु भट्टीतुन मोहाची गावठी दारु तयार करताना आढळल्या. सदर महिला आरोपीसह त्यांनी
गावठी मोहा दारु तयार करणेकरीता वापरलेले साहित्य, गावठी गरम मोहा रसायन, गावठी मोहा दारु, लोखंडी ड्रम तसेच प्लास्टीक कॅन असा एकुण 49 हजार 300 रुपयाचा माल जप्त करीत पंचनामा
कार्यवाही करुन यातील महिला आरोपीना दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली. पोलिस स्टेशन समुद्रपुर येथे संबंधितावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम तसेच समुद्रपुर येथील ठाणेदार श्री. प्रशांत काळे यांचे मार्गदर्शनामध्ये पोउपनि आर.बी.खोत, पोहवा अरविंद येणुरकर, चालक पोहवा अजय वानखेडे पोना रवि पुरोहित, रवि वर्मा, किशोर ताकसांडे, पोशि वैभव चरडे, होमगार्ड आकाश कापकर, रजत भगत,
घुमडे यांनी केली.