Home > Crime news > वर्धा ब्रेकिंग,,, सहसिक वृत्तपत्राचे संपादक, मालक तसेच सहसिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर वर प्राणघातक हल्ला...

वर्धा ब्रेकिंग,,, सहसिक वृत्तपत्राचे संपादक, मालक तसेच सहसिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर वर प्राणघातक हल्ला...

# हल्ला करणारे सात ते दहा लोक # प्राणघातक हल्ला करणारे पसार # हल्ल्यात रवींद्र कोटमकर यांची प्रकृती गंभीर

वर्धा ब्रेकिंग,,,    सहसिक वृत्तपत्राचे संपादक, मालक तसेच सहसिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर वर प्राणघातक हल्ला...
X

वर्धा ब्रेकिंग,,,

सहसिक वृत्तपत्राचे संपादक, मालक तसेच सहसिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर वर प्राणघातक हल्ला...

# हल्ला करणारे सात ते दहा लोक

# प्राणघातक हल्ला करणारे पसार

# हल्ल्यात रवींद्र कोटमकर यांची प्रकृती गंभीर

सहासिक वृत्तपत्राचे संपादक मालक तसेच सहासिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असून सेवाग्राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे हमला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताचं त्यांचे अनेक चाहते रुग्णालयाकडे धाव घेतल्याने पोलिसांना यावेळेस मोठा कडक बंदोबस्त लावावा लागल . झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आरोपींच्या शोधात पोलिसांचे अनेक पथक कार्यान्वित करण्यात आले आहे .

हा हल्ला फिल्मी स्टाइल पद्धतीने करण्यात आला वर्धे वरून नागपूरकडे जात असताना दत्तपूर शिवारामध्ये असलेल्या अंडरपास मध्ये गाडी येताच धावत्या गाडीला हमलावरानी आपल्या गाड्या मागून-पुढून रवींद्र कोटमकर यांच्या गाडीला घेरले चालत्या गाडीत ड्रायव्हर साईडने जोरदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने गाडी अनबॅलेन्स झाली हमलावरांनी गाडीच्या काचा फोडल्यात ड्रायव्हर व रवींद्र कोटमकर यांना गाडी बाहेर काढून तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर सपासप वार केलेत त्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने हमलावरांनी तेथून पळ काढला तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

घटनेचा पंचनामा सेवाग्राम पोलिस करीत असून हल्ला करणारे कोण याचा तपास पोलीस करीत आहेत मात्र दोन दिवसांपूर्वीच रवींद्र कोटमकर यांनी माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनातून दिली होती आणि आज त्यांच्यावर हल्ला झाल्याने पोलिस प्रशासनातही खळबळ निर्माण झाली आहे..

Updated : 19 April 2022 1:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top