वडनेर पोलिसांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक: ३ पोलिस कर्मचारी जखमी:
Wadner police vehicle hit by unknown vehicle: 3 police personnel injured:
X
हिंगणघाट . दि.१७/
वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पिपरी (पोहणा) येथे बुधवारी १६ मार्चला रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने प्रवाशी घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सने बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टिप्परवर मागून जबर धडक होऊन भिषण अपघात झाल्याची माहिती वडनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आपल्या वाहनाने अपघातस्थळी जाऊन आज गुरुवारी १६ मार्चला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला परत घेऊन येत असताना अज्ञात वाहनाने पोलिसांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली.या अपघात पोलिस वाहन चालक गणेश मेश्राम ,पंढरी शेळके,खोडे जखमी झाले जखमींना तातडीने वडनेर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संबंधी वडनेर पोलिसांनी अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहे.पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली , पियस आय सोंनपितले , अमोल खाडे , अतुल लभाणे ,तपास करीत आहे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला,