Home > Crime news > गुटख्याची अवैद्य वाहतूक करणारा ट्रक वडकी पोलिसांच्या ताब्यात

गुटख्याची अवैद्य वाहतूक करणारा ट्रक वडकी पोलिसांच्या ताब्यात

Wadaki police seize truck transporting gutkha illegally

गुटख्याची अवैद्य वाहतूक करणारा ट्रक वडकी पोलिसांच्या ताब्यात
X

वडकी पोलिसांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

६१ लाखरुपयांचा सागर गुटखा जप्त

अमोल सांगानी

राळेगाव

दि.१३ ऑगष्ट रोजी रात्री १०,३० चे दरम्यान विनायक जाधव ठाणेदार पोस्टे वडकी व पोस्टे स्टाफ यांचे सह पोस्टे हद्दीतील देवधरी घाट परीसरामधे पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार विनायक जाधव यांना गोपनिय बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, हैद्राबाद वरून वडकी जि. यवतमाळ मार्गे एक तपकीरी रंगाचा 10 चाकी ट्रक क्र. टि.एस. 12 यु.ए. 1228 हा ट्रकमधे अवैद्य गुटाखा भरून नागपुर कडे जात आहे अशा खात्रीलायक बातमी वरून ठाणेदार विनायक जाधव व पोस्टे स्टाफ यांनी देवधरी घाट येथे रात्री १०,३० वाजता नाकाबंदी करून वाहने चेक करत असतांना माहीती प्रमाणे एक तपकीरी रंगाचा 10 चाकी ट्रक क्र. टि.एस. 12 यु.ए. 1228 हा ट्रक संशईत रित्या आला सदर ट्रक पोस्टे स्टाफचे मदतीने थांबवुन ट्रक चालकास त्याचे नाव गाव विचारले असता आरोपी क्र. 1) गुड्डु देवनारायण कोरी वय 38 वर्ष क्र. 2) जगजिवणलाल कुमार वय 23 वर्ष दोन्ही रा. घाटमपुर, नवाबगंज, इलाहबाद, अटरामपुर उत्तर प्रदेश असे सांगीतले त्यांना ट्रकमधे कशाचा माल भरलेला आहे याबाबत विचारणा केली असता. त्याने ट्रकमधे अंड्याचे ट्रे भरलेले असल्याचे सांगीतले त्यास त्याबाबत कागदपत्राची विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगीतले वरून त्यांचेवर संशय आल्याने पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांनी पोस्टे स्टाफचे मदतीने सदर ट्रकची तिनपद्री ताडपत्री काढुन पाहणी केली असता ट्रकमधुन गुटख्याचा सुगंध येत होता. ट्रकमधे सागर २००० पान मसाला गुटख्याचे 166 नग डाग (बोरी) किंमत 61,55,340/- रुपयाचा गुटखा मिळुन अला सदर गुटखा ताब्यात घेवुन अन्न व औषध प्रशाषण यांना माहीती देण्यात आली त्यांचे अधीकारी पोस्टे वडकी येथे हजर झाले असता त्यांचे फिर्यादी वरून आरोपी यांचे विरूध्द पोस्टे वडकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे।सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री. दिलीप भुजबळ पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरने साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी पांढरकवडा श्री. प्रदीप पाटील साहेब यांचे मार्गदर्शाखाली सपोनि श्री. विनायक जाधव ठाणेदार पोस्टे वडकी, पोलीस उपनिरिक्षक मंगेश भोंगाडे, पोहवा विनोद नागरगोजे, विलास जाधव,सुरज चिव्हाणे, रूपेश जाधव,विकेश घ्यावीवार,यांनी केली आहे.

Updated : 14 Aug 2021 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top