Home > Crime news > यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

Vruddha died on the spot in a crane collision at Darva in Yavatmal district

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू
X

गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.


यवतमाळ : दारव्हा येथे क्रेनची धडक बसल्याने एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरवारी दुपारी १ वाजता आर्णी मार्गावर घडली. प्रल्हाद डोमे (६०) रा .टाळळी (बु.) असे मृताचे नाव आहे. जनावरांचा चारा विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.

नेहमीप्रमाणे गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची या मार्गावरून वाहतूक केली जाते.

दिवसभर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला. खड्ड्यांमुळे एका व्यक्तीला आपला जिव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

Updated : 24 July 2021 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top