Home > Crime news > पत्नीस शिवीगाळ व मारहाण प्रकरणी विनोद ताटके यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पत्नीस शिवीगाळ व मारहाण प्रकरणी विनोद ताटके यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

Vinod Tatke has been charged under various sections for abusing and beating his wife

पत्नीस शिवीगाळ व मारहाण प्रकरणी विनोद ताटके यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल
X

पत्नीस शिवीगाळ व मारहाण प्रकरणी विनोद ताटके यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

मंगरुळपीर-पत्नीस शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विनोद ताटके यांचेवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आरती उर्फ ललिता विनोद ताटके रा.शहापूर या महिलेने तक्रार दिली की,फिर्यादीचा पती एसीजेपी चा कार्यकर्ता असून तो समाजातील महिलांच्या कोर्टाच्या कामात मदत करतो.गोहगाव येथील एका महिलेचे कोर्टाचे काम फिर्यादीचा पती पाहतो.ती महिला दोन वेळा फिर्यादीचे घरी आली होती. ता. २७ रोजी फिर्यादिने त्या महिलेस बोलचाल केली असता विनोद ताटके याने फिर्यादिस शिवीगाळ करून पट्ट्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहे.

विनोद ताटके याची एसिजेपी संघटनेमधुन याआधीच केली आहे हकालपट्टी

पिडितांची व जनसामान्यांची फसवणुक करुन एसीजेपी या संस्थेचे नाव बदनाम करणे सुरु होते त्यामुळे संघटनेतील वरिष्ठांनी विनोद ताटके याची तात्काळ हकालपट्टी केली होती हे विषेश.

प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 6 Jan 2021 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top