महिला पोलीस ऊपनिरीक्षका सह दोन पोलीस नाईक एसीबी च्या जाळ्यात
Two policemen with female police sub-inspectors in Nike ACB's trap
X
महिला पोलीस ऊपनिरीक्षका सह दोन पोलीस नाईक एसीबी च्या जाळ्यात
(फुलचंद भगत)
वाशीम:- तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयामध्ये त्यांना मा.कोर्टकडून मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी, व मा. कोर्टांनी तक्रारदार यांना आर्थिक गुन्हे शाखा वाशीम येथे लावलेल्या हजेरीला हजर न राहण्यासाठी व तक्रारदार यांचे विरोधात यापुढे नमुद गुन्ह्यांमध्ये कोणताही त्रास न देण्यासाठी यातील आलोसे क्र. 1 श्रीमती. धोंडगे पोलीस उपनिरीक्षक,यांनी 1,50,000/- रुपये ची मागणी करत असलेल्या बाबत दि.06/06/2022 रोजी तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना आलोसे क्र. 1 श्रीमती. धोंडगे पोलीस उपनिरीक्षक, यांनी 1,50,000/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 30,000/-रूपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि.07/ 07/2022 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र.2 श्री अश्विन जाधव यांनी सदरची लाच रक्कम श्रीमती. धोंडगे पोलीस उपनिरीक्षक यांचे वतीने पंचासमक्ष 30,000/- रुपये स्वीकारले. तर आलोसे क्र.3 श्री राजेश गिरी यांनी तक्रारदार यांना श्रीमती धोंडगे पोलीस उपनिरीक्षक यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले व आलोसे क्र.2 सोबत लाच रक्कम स्विकारताना हजर राहून, तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारले बाबत त्यांचे फोनवरून श्रीमती धोंडगे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. आलोसे क्र.1 व 3 ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीविरुद्ध पो.स्टे. मंगरूळपीर जि. वाशिम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या मध्ये मार्गदर्शन मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती यांनी काम पाहिले तर सापळा व तपास अधिकारी शिवलाल भगत, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.अमरावती कारवाई पथक शिवलाल भगत, पोलीस उप अधीक्षक, सतिश उमरे, पोलीस निरीक्षक, श्रीमती अफुणे, पोलीस निरीक्षक, मपोहवा/ श्रीमती गायकवाड, अँटी करप्शन ब्युरो वाशिम, व पोना/ युवराज राठोड, पोशी/रवि मोरे, मपोहवा/साबळे ला.प्र.वी.अमरावती.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
अ.क्र.१ यांचे सक्षम मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई
अ.क्र.२ व ३ यांचे सक्षम मा.पोलीस अधीक्षक, जिल्हा वाशीम.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती, अमरावती पोलीस उप अधीक्षक
दुरध्वनी क्रं - 0721- 2552355
मो.7020693481
टोल फ्रि क्रं 1064 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206