Home > Crime news > दोन मोटारसायकल चोरांना अटक; त्यांच्याकडून ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/रू. हस्तगत

दोन मोटारसायकल चोरांना अटक; त्यांच्याकडून ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/रू. हस्तगत

वाशिम शहर पो.स्टे.डि.बी पथकाची कार्यवाही

दोन मोटारसायकल चोरांना अटक;    त्यांच्याकडून ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/रू. हस्तगत
X

फुलचंद भगत

वाशिम:-दि. २८/०६/२०१८ रोजी फिर्यादी श्री. शेख मुजीब शेख बाबा, वय ३३ वर्ष,धंदा-मजुरी, रा. गंगू प्लॉट, वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे फिर्याद दिली होती की, दि. २६/०६/२०१८ रोजी रात्री ०१:०० ते ०७:०० वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल क. एम.एच. ३७ एक्स. ३०४५ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा रिपोर्ट वरून वाशिम शहर पोलीस स्टेशन अप. क.२५९/२०१८, कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला.दि. १६/१०/२०२१ रोजी आरोपी नामे शिवाजी अशोक जाधव, वय २३ वर्ष,धंदा-मजुरी, रा. मोठा गवळीपुरा, वाशिम यास सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन त्यास सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा दि.२०/१०/२०२१ रोजीपर्यंत पि.सी.आर. घेण्यात आला. त्यानंतर सदर आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथून आणखी ०३ मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले व त्यापैकी ०२ मोटारसायकल या सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथील इसम नामे विलास बाबुराव जाधव यास विकल्याचे व एक मोटारसायकल तो यापुर्वी काम करीत असलेल्या उमरखेड, जि. यवतमाळ येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यासह सिंदखेड राजा येथे जाउन आरोपी इसम नामे विलास बाबुराव जाधव, वय २३ वर्ष, धंदा-मजुरी, रा. जिजामाता नगर झोपडपट्टी, सिंदखेड राजा, जि. बुलढाणा याच्याकडून एच.एफ. डिलक्स कंपनीच्या ०२ मोटारसायकल तसेच उमरखेड, जि. यवतमाळ येथून ०१ हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल अशा एकूण ०४ मोटारसायकल, किंमत रू. १,३०,०००/- हस्तगत करण्यात आल्या आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. धृवास बावनकर यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क.३४७/लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. ८५६/रामकृष्ण नागरे, पो.शि.क. २१०/मात्रे, पो.शि.क.२४३/विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३/संदीप वाकुडकर यांनी पार पाडली असून सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.क. ३४७/लालमणी श्रीवास्तव हे करीत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 20 Oct 2021 5:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top