Home > Crime news > तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना केली अटक

तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना केली अटक

Two arrested for smuggling rice

तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना केली अटक
X

यवतमाळ -: रेशनच्या तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून ४२ कट्टे तांदूळ आणि वाहन असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आर्णी येथे ही घटना घडली. याबाबत आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश मोहन आडे रा. कवडीपुर पुसद, संदेश भिमराव राठोड रा.पुसद अशी आरोपीची नावे आहे. लॉकडाऊनच्या काळात दारिद्रय रेषेखालील आणि प्राधान्य कुटूंबांना देण्यात येणाहृया तांदुळाचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

त्याची शहनिशा प्रशासन करीत असतांना आर्णी तालुक्यातील कोपरा फाट्यावर ट्रक क्रमांक एम. एच. २९ टि १४९७ यामध्ये रेशनचा तांदूळ पकडण्यात आला. यवतमाळ येथून कोपरा फाटा वरून दिग्रस कडे हा तांदुळ काळा बाजारात जात होता. ही बाब पोलिसांना कळताच वाहन अडविण्यात आले. त्यात ४२ कट्टे रेशनचा तांदूळ होता. त्याची किंमत ४,८३० रुपये इतकी आहे. पोलिसांनी वाहनासह तांदूळ असा एकुण २० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पुरवठा पुरवठा निरिक्षकांना माहीती देण्यात आली.पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 15 July 2021 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top