Home > Crime news > वाशिम जिल्हयातील मोटार सायकल चोरणाऱ्या दोन इसमांचे ताब्यातुन ४ मोटार एकुण किंमत २,६५,०००/- जप्त

वाशिम जिल्हयातील मोटार सायकल चोरणाऱ्या दोन इसमांचे ताब्यातुन ४ मोटार एकुण किंमत २,६५,०००/- जप्त

Total value of 4 cars from the possession of two ISMs who stole motorcycles in Washim district 2,65,000 / - confiscated

वाशिम जिल्हयातील मोटार सायकल चोरणाऱ्या दोन इसमांचे ताब्यातुन ४ मोटार एकुण किंमत    २,६५,०००/- जप्त
X

फुलचंद भगत

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी गुन्हे गारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता दिवसा/रात्री गस्त वाढवुन पोलीसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक कायम ठेवला आहे. वाशिम जिल्हयात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीस लागले होते.

दिनांक २८/०२/ २०२२ रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर लक्ष्मणराव गांजरे वय ५५ वर्षे यांनी त्यांची मोटार सायकल चोरीस गेल्याने पोस्टे मंगरुळपीर येथे अपक्र १६९/२२ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वेगवेगळया ठिकाणी गस्त वाढवुन माहिती काढण्याचे आदेश दिले. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारंजा शहरात गस्त घालीत असताना गोपनिय माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) भारत विनोद घोडे वय २० वर्षे रा मंगरुळवेश कारंजा जि वाशिम २) शाकिर शहा दाऊद शहा वय २० वर्षे रा काटी पाटी ता अकोट जि अकोला ह मु नुर नगर कारंजा जि वाशिम हे चोरीच्या मोटार सायकल विक्री करण्याकरीता पिंप्री सुर्वे फाटयाजवळ थांबले असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन त्यांनी एक होंडा कंपनीच्या लिव्हो गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी मंगरुळपीर येथुन पल्सर मो/सा, कारंजा शहर येथुन होंडा शाईन मो/सा, कारंजा ग्रामीण येथील पॅशन प्रो, पोस्टे सिटी कोतवाली अमरावती शहर येथील होंडा लिव्हो अशा चार मोटार सायकल त्याचे साथिदारासह चोरल्याची कबुली दिली. सदर चारही मोटार सायकल एकुण किंमत २,६५,०००/- आरोपीतांकडुन जप्त करण्यात आल्या असुन नमुद आरोपी व चारही मोटार सायकल पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांचे ताब्यात देण्यात आल्या असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मंगरुळपीर हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक,श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर, सपोनि इंगळे पोना अमोल इंगोले,राजेश गिरी,प्रशांत राजगुरु,राजेश राठोड, अश्विन जाधव.प्रविण राऊत, अविनाश वाढे, सायबर सेल चे पोकॉ गोपाल चौधरी,प्रशांत चौधरी यांनी सहभाग नोंदविला.

Updated : 18 March 2022 5:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top