Home > Crime news > खाऊचे आमिष दाखवून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार

खाऊचे आमिष दाखवून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; आरोपी अद्यापही फरारच

खाऊचे आमिष दाखवून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार
X

खाऊचे आमिष दाखवून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार

सौ.संतोषी वर्मा

राळेगाव /प्रतिनिधि

यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; आरोपी अद्यापही फरारच

उमरखेड, : आई-वडील शेतात मजुरीला गेले असताना अंगणात खेळणार्‍या 6 वर्षीय व 4 वर्षीय बालिकांना खाऊसाठी पैसे देतो म्हणून आमिष दाखवीत घरी नेऊन दोघींवरही अत्याचार केल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 च्या दरम्यान तालुक्यातील साखरा या गावात घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपी विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र घडलेल्या घटनेमुळे लहानशा साखरा या गावामध्ये प्रचंड संताप आहे.

बालाजी ऊर्फ बाळू श्यामराव भोळे (वय 40) असे कुकर्म करणार्‍या नराधमाचे नाव असून तो साखरा या गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी पीडित बालिकेचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले होते. त्यामुळे त्यांची 6 वर्षीय मुलगी आपल्या 4 वर्षीय मैत्रिणीसोबत अंगणात खेळत होती. तेवढ्यात नराधम बाळूने खाऊसाठी पैशांचे आमिष देत त्या दोघींना घरात बोलावले. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करीत त्या दोन्ही चिमुकल्यांवर अत्याचार केला. ही बाब पीडित चिमुकल्यांच्या दोन वर्षांनी मोठा असलेल्या भावाच्या लक्षात आली. त्याने याबाबत घर गाठून आजीला सांगितले. घरी गेल्यानंतर आजीने त्या नराधमाचे दार ठोठावले. मात्र कुणाचाही आवाज आला नसल्याने काहीतरी गैरसमज झाल्याचे समजून आजी घराकडे परत निघाली असता या दोन्ही मुली त्या नराधमाच्या घरातून बाहेर आल्या.

मुलींना बघताच आजी आणि शेजारी राहणार्‍या महिलांनी त्या दोघींना विचारणा केली. परंतु घाबरलेल्या चिमुकल्यांनी काहीच सांगितले नाही. मात्र त्यानंतर थोड्या वेळाने दोघींनीही घडलेला प्रकार कुटुंबियांकडे कथन केला. त्यानंतर नराधमाची दोन्ही कुटुंबांनी शोधाशोध केली. परंतु तो नराधम पसार झाला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी चिमुकल्यांना सोबत घेत उमरखेड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही पीडित बालिकांना रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बाळू भोळे याच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील नराधम आरोपी बाळू भोळे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक नारायण पांचाळ, बिट जमादार संतोष चव्हाण करीत आहेत.

Updated : 5 March 2022 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top