Home > Crime news > लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत महिलेवर अत्याचार

Torture of a married woman by showing the lure of marriage

लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत महिलेवर अत्याचार
X

उमरखेड प्रतिनिधी :- तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दगड धानोरा येथील एका 32 वर्षीय इसमाने विवाहित महिले सोबत प्रेम संबंध बनवून लग्नाचे आमिष देऊन शरीर सुखाची मागणी केली. अशी फिर्याद .1मार्च रोजी पोलीस स्टेशन.पोफाळी येथे येउन जबानी रिपोर्ट दिला

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन तीन महीण्यापुर्वी यातील फिर्यादी ही आरोपीचे शेतात ऊस कापणी करीता गेली असता आरोपीने तिचे सोबत ओळख करुन प्रेमसंबंध निर्माण करुन तिला शारिरीक संबंध करण्याची मागणी केली. फिर्यादीने शारिरीक संबंध करण्यास नकार दिला तेंव्हा आरोपीने मी तुझ्यावर खुप प्रेम करतो व मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणुन तिचे सोबत त्याचे शेतातील कोठ्यामध्ये जबरीने शारिरीक संबंध केले,त्यानंतर .25 फेब्रुवारी रोजी यातील आरोपीने फिर्यादीसोबत लग्नाचे आमिश दाखवुन अनेक वेळा शारिरीक संबंध निर्माण केले..27 फेब्रुवारी रोजी फिर्यादीने आरोपीस भेटुन लग्णाबाबत विचारणा केली असता, आरोपीने लग्नास नकार दिला. तु जर आपले संबंधाबाबत कुणाला सांगितले तर तुला जिवाने मारिन अशी धमकी दिली. तिला शिवीगाळ केली असा जबानी रिपोर्ट पोफळी पोलिस स्टेशनला दिला यावरून आरोपी किशोर पंजाब देशमुख वय 32 ला अप क्र.४५/२२ कलम ३७६(२)(एन),५०४,५०६ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. पुढील तपास पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित राम गडदे,देविदास आठवले, ज्ञानेश्वर मुंडे हे करीत आहेत.

Updated : 3 March 2022 2:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top