Home > Crime news > नेताजी नगरातील तीन महिलांना चोरीप्रकरणात अटक

नेताजी नगरातील तीन महिलांना चोरीप्रकरणात अटक

Three women arrested in Netaji

नेताजी नगरातील तीन महिलांना चोरीप्रकरणात अटक
X

यवतमाळ

गर्दीच्या ठिकाणी चोरी करणार्‍या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शनिवार 25 रोजी दुपारी यवतमाळ येथील नेताजीनगरातून अटक केली.

भिकाबाई नाडे (42), सपना हातागाडे (27) आणि आशा नाडे (48) सर्व रा. नेताजीनगर झोपडपट्टी यवतमाळ, अशी चोरट्या महिलांची नावे आहेत.

गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारी टोळी सक्रिय असून या टोळीची सेवाग्राम पोलिस ठाण्यात 20 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत वर्धा पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. दरम्यान, चोरटे यवतमाळ येथील असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळात रवाना झाले. नेताजीनगरातून या टोळीला ताब्यात घेत चौकशी केली.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक पिवळ्या धातूची दोन डोरले असलेली पोत, 39 गोल मनी व चार डोळ 4.50 ग्रॅम वजन असलेली 19 हजार 280 रुपये, पिवळ्या धातूचे चैनटॉप्स (झुमके) वजन 3.50 ग्रॅम किंमत 14 हजार 600 रुपये, रोख 4 हजार रुपये असा 37 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक महंेंद्र इंगळे, ढोले, सहाय्यक फौजदार जांभुळकर, शाहीन, अखिल इंगळे यांनी केली.

Updated : 25 Dec 2021 7:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top