Home > Crime news > तीन शाळा फोडून दीड लाखाचा साहित्य लांबवले

तीन शाळा फोडून दीड लाखाचा साहित्य लांबवले

Three schools were demolished and 1.5 lakh materials were confiscated

तीन शाळा फोडून दीड लाखाचा साहित्य लांबवले
X

झेड. ए. खान (बुलडाणा जिल्हा)


खामगाव: दोनच दिवसापुर्वी खामगाव तालुक्यातील विहिगाव येथील तीन शाळा चोरट्यांनी फोडून टीव्ही सहित्य लंपास केले होते. त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी आणखीन काही शाळांना लक्ष्य केले आहे.26 जुलैला सकाळी तीन शाळा फोडून सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याचे समोर आले आहे. जागृती ज्ञानपीठ आंबेटाकळी श्री संत नारायण महाराज विद्यालय आंबेटाकळी व कृष्णराव रामजी पाटील विद्यालय बोरी आडगाव या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. जागृती ज्ञानपीठ च्या मुख्याध्यापकांनी आज हिवरखेड पोलीस स्टेशनला चोरांची तक्रार दिली. त्यांच्या शाळेतील वाचमन गोपाल नेमाने राहणार शिरला नेमाने यांनी त्यांना सकाळी साडेसहाला फोन करून चोरीची माहिती दिली होती. शाळेतील कार्यालयाचे व बाजूच्या वर्ग खोलीची कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त दिसत असल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता आहुजा कंपनी चे ऍम्प्लिफायर एक किंमत 10 हजार जिओ कंपनीचे वाय फाय किंमत 1 हजार डीव्हीआर किंमत पाच हजार रुपयांचे चोरून नेले व शाळेतील कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्याची नासधूस केल्याचे दिसून आले. यात अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. असा एकूण एकवीस हजारांची साहित्य चोरीस गेले. दुसऱ्या घटनेत कृष्णराव रामजी पाटील महाविद्यालय बोरी आडगाव येथील एलईडी टीव्ही किंमत पंधरा हजार रुपये व डेल कंपनी चे 7 कॉम्प्युटर किंमत 1 लाख 5 हजार रुपये असे एकूण 1 लाख 20 हजार रुपयाचे साहित्य चोरीस गेले. तिसऱ्या घटनेचे श्री संत नारायण महाराज विद्यालय आंबेटाकळी येथील वर्गखोल्यांचे व कपाटाचे कुलूप तोडून साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले

Updated : 27 July 2021 8:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top