उमरी गावाजवळ भिषण अपघात, मृत पावलेले तिघे ऐकाच कुटुंबातील..
Three members of the same family died in a tragic accident near Umri village
X
मारोती बारसागडे मो नं ८३९००७८३६७
चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी- आष्टी मार्गांवरील आष्टी पासुन 3 कि मी असलेल्या उमरी जवळ ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकिवरील तिघे जन जागीच ठार झाल्याची दुदैंवी घटना घडली बुधवारला दुपारी साडेतीनच्या सुमारास गडचिरोली वरुन आष्टी कडे जाणारा ट्रक क्र ए पी १६ टि वाय ६८२२ आष्टी कडून कोनसरी कडे जाणारी दुचाकी क्र एम एच ३३वाय ४२९५ ला जबर धडक दिली यात दुचाकी वरील तिघे जागीच ठार झाले .मृत सुरज बालाजी कुसनाके वय ३५ वर्ष मु मुधोली ललीता नितेश कुसनाके वय २५वर्ष रा मधोली रिठ रितिका नितेश कुसनाके वय ४. वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली यांचा समावेश आहे. ललीता कुसनाके ही रितिका ची आई आहे व सुरज हा ललीता कुसनाके यांचा दिर आहे. सुरज कुसनाके आपल्या वहिनी व पुतणीला गोंडपिपरी येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले होते उपचार घेवून परत येत असताना काळाने कुसनाके कुटुंबीयावर घाला घातला .हा अपघात इतका भीषण होता की ४वर्षीय रितिका मेंदु बाहेर निघाला तर दुचाकी जळुन खाक झाली दु:ख प्रसंगांमुळे मुधोली रिठ वासीयावर शोककळा पसरली आहे.