Home > Crime news > ढाणकी परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन दिवसात तीन घटना.

ढाणकी परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन दिवसात तीन घटना.

Three heart-wrenching incidents in Dhanki area in two days.

ढाणकी परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन दिवसात तीन घटना.
X

[ढाणकी एका घटनेने तर करंजी २४ तासांत २ घटनेने हादरले.]

प्रतिनिधी/ढाणकी आसीफ खान पठाण मो.9921812003

यवतमाळ/उमरखेड : ढाणकी येथे कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड ने दि.३०जून रोजी रात्री ८ वाजता आपल्या राहत्या रूम मध्ये आत्महत्या केली. तसेच करंजी येथील विस वर्षीय युवतीने देखील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. तर करंजी येथेच दिनांक १ जुलै रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या.

याबाबत सुत्रांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मूळचा राहुरचा रहिवासी असलेला शुभम चप्पलवाड (२५) हा मागील दोन वर्षापासून बिटरगाव बु. पोलीस स्टेशनला होमगार्ड या पदावर कार्यरत होता.नेहमीप्रमाणे नाईट ड्युटी साठी रात्रीचे दहा वाजले तरी तो हजर झाला नसल्यामुळे, त्याचा मित्र रूमवर बोलावण्यासाठी गेला असता, शुभम फासावर लटकलेला आढळला. तसेच करंजी येथील युवती प्रणिता मानिकवाड (२०) हिने सुध्दा गळफास घेऊन आपले जीवन संपविले. दोन्ही प्रकरणाचा तपास बिटरगांव पोलीस करत असता २४ तासाच्या आत तिसरी घटना करंजी याच गावी एक जुलै रोजी रात्री घडली. वेडसरपणा च्या आजाराने ग्रासलेल्या मोठ्या भावाने रात्री गाढ झोपेत असलेल्या लहान भावाच्या डोक्यावर, तोंडावर व मानेवर गज तोडण्यास वापरात येणाऱ्या छण्णी ने सपासप वार करुन त्याची जागीच निर्घृण हत्या केली. समाधान बापूराव घुगरे(१२) असे मृतकाचे नाव असून, आरोपीचे नाव सचिन बापूराव घुगरे(२२) आहे. सदर आरोपीस बिटरगाव बु. पोलिसांनी अटक केली असून, ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात रामकिसन जायभाये यांच्या नेतृत्वात देविदास हाके, रवी गिते, गजानन खरात, सतिष चव्हाण,दत्ता कुसराम, मोहन चाटे,आतीश जारंडे,नरेंद्र खामकर पुढील तपास करीत आहेत.

वरील तिनही घटना ह्या सद्यस्थीतीतील शिक्षणातील केवळ मूल्य शिक्षणाचा अभाव होय. अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Updated : 3 July 2021 4:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top