Home > Crime news > तीन अॅल्युमिनीअम चोरांना अटक

तीन अॅल्युमिनीअम चोरांना अटक

५,४४,०००/- रूपयांचे अॅल्युमिनीअम चारचाकी वाहनासह हस्तगत

तीन अॅल्युमिनीअम चोरांना अटक
X

तीन अॅल्युमिनीअम चोरांना अटक;

५,४४,०००/- रूपयांचे अॅल्युमिनीअम चारचाकी वाहनासह हस्तगत

पो.स्टे.वाशिम शहर डिबी पथकाची कारवाई

फुलचंद भगत

वाशिम:-दि. ०५/१०/२०२१ रोजी फिर्यादी श्री. आनंद विनोद गडेकर, वय ३६ वर्ष,धंदा-व्यवसाय, रा. 'सावली', अंबिका नगर, झाकलवाडी रोड, लाखाळा, वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे फिर्याद दिली की, दि. ०४/१०/२०२१ रोजी रात्री ०८:३० ते दि,०५/१०/२०२१ रोजी ११:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या गैरहजेरीत कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ 'मिडास अॅल्युमिनीअम' या दुकानाच्या टिनाच्या गोडाउनच्या मागच्या बाजूच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतमधील अंदाजे ०२ ते २.२५ क्विटल कलर अॅनोडाईज अॅल्युमिनीअम किंमत अंदाजे ७०,०००/- ते ८०,०००/- रू. ची चोरी केली व यापुर्वी देखील त्यांच्या दुकानात अशाच प्रकारे यापुर्वी देखील चो-या झाल्याचे सांगितले अशा रिपोर्ट वरून वाशिम शहर पोलीस स्टेशन अप. क. १३०९/२०२१, कलम ४६१,३८० भा.दं.वि.अन्वये दाखल करण्यात आला.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साो. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री. धृवास बावनकर यांनी सदर गुन्हयाच्या तपासाबाबत डि.बी. पथकास आदेश देउन रवाना केले असता डि.बी. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १)हमबीर सिंग साधूसिंग, वय २५ वर्ष, धंदा-खाजगी नोकरी २) विनीत कुमार चंद्रपाल सिंग, वय१९ वर्ष, धंदा-खाजगी नोकरी, दोघेही रा. ग्राम नगला रघी, पो.स्टे. बहोरा, तहसिल:- पटियाली,जि. कासगंज, राज्य:- उत्तर प्रदेश, ह.मु. मनीष हार्डवेअरच्या समोर, आकाश गुप्ता यांच्या घरी,पाटणी चौक, वाशिम ३) गंगाधर नथूजी सुर्वे, वय ४२ वर्ष, धंदा-चालक, रा. आल्लाडा प्लॉट,वाशिम यांना सदर गुन्हयाचे संदर्भात सखोल विचारपूस केली असता आरोपी क. ०१ व ०२ यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले असता आरोपींना सदर गुन्हयात अटक करून त्यांचा पि.सी.आर. घेण्यात आला व आरोपी क. ०१ व ०२ यांच्याकडून १) टाटा एस. गाडी क. एम.एच. १२ के.पी. २७०५, किंमत अंदाजे रू. २,५०,०००/- २) २३० किलोग्रॅम कलर ॲनोडाईज अॅल्युमिनीअम, किंमत रू. ८०,५००/-३) २५८ किलोग्रॅम कलर ॲनोडाईज अॅल्युमिनीअम,किंमत रू. ९०,३००/-४) २०२ किलोग्रॅम कलर ॲनोडाईज अॅल्युमिनीअम, किंमत रू.७०,७००/-५) १५० किलोग्रॅम कलर ॲनोडाईज अॅल्युमिनीअम, किंमत रू. ५२,५००/- असा एकूण रू. ५,४४,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्हयाच्या कलमात कलम ३८१,३४ भा.दं.वि. अन्वये वाढ करण्यात आली आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. धृवास बावनकर यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि खंदारे, पो.ह.क.३४७/लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. ८५६/रामकृष्ण नागरे, पो.शि.क. २१०/मात्रे, पो.शि.क.२४३/विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३ / संदीप वाकुडकर यांनी पार पाडली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन, वाशिम शहर हे करीत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 8 Oct 2021 7:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top