सैय्यद मोबीनोद्दीन सैय्यद इलीयासोद्दिनच्या हत्याकांडातील तिसरा आरोपी अडीच महिन्यांनंतर मुंबईवरून अटक
Third accused in Syed Mobinoddin Syed Ilyasoddin's murder arrested from Mumbai two and a half months later
X
वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विजय टॉकीज परिसरातील कृष्णा कार्तिक नगर येथील खुल्या ले आऊटमध्ये वसंतनगर येथे राहणा-या युवक सैय्यद मोबीनोद्दीन सैय्यद इलीयासोद्दिन खतीब उर्फ छोटू वय २८ वर्षे यांची दि.२१ नोव्हेंबर रोजीच्या रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान ८ जणांनी मिळून धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करून पसार झाले होते. हत्याकांडातील ८ आरोपींपैकी दोन आरोपींना वसंत नगर पोलिसांनी घटनेच्या दिवशीच अटक केले होते. तर मुख्य मारेकरी शेख मुख्तार शेख निजाम (मुलतानी) व त्याचे पाच साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले होते. पसार झालेल्या सहा आरोपींपैकी एका आरोपीला मुंबईच्या नाला सोपारा येथुन दि.2 फेब्रुवारी रोजी वसंत नगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वसंत नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण नाचंकर यांनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपी शेख अकील शेख शकील याला दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी वी. पुसद न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे न्यायाधीश टि.फुलारी यांनी दि. 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्याकांडातील मुख्य मारेकरी फरार असून मुख्य मारेकऱ्यांसह ईतर सर्व आरोपींचा शोध वसंत नगर पोलिसांकडून सुरू आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी ८ जणांनी हत्याकांड घडविण्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती. हत्याकांडात सहभागीपैकी तीन आरोपींना आतपर्यंत पोलिसांनी अटक केले आहे. तर मुख्य मारेकरी शेख मुखत्तार शेख निजाम (मुलतानी) अजुनही पसार असुन तो नुकताच पुसदमध्ये त्याच्या राहत्या घरी येऊन गेल्याची चर्चा आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने मृतक यांच्या नातेवाईकांमध्ये तसेच साक्षीदार मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मुख्य अरोपिंसह इतर सर्व आरोपींच्या तात्काळ शोध घेऊन अटक करण्याची मागणी होत आहे. आरोपीला वी. न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकील टि.यु. चव्हाण यांनी पोलीसांकडून भक्कम बाजू मांडली होती.