Home > Crime news > महिलेच्या बॅगमधून 8 लाख 50 हजारांचे सोने चोरट्यांनी केले लंपास

महिलेच्या बॅगमधून 8 लाख 50 हजारांचे सोने चोरट्यांनी केले लंपास

Thieves stole gold worth Rs 8 lakh 50 thousand from a woman's bag

महिलेच्या बॅगमधून 8 लाख 50 हजारांचे सोने चोरट्यांनी केले लंपास
X

महिलेच्या बॅगमधून 8 लाख 50 हजारांचे सोने चोरट्यांनी केले लंपास


यवतमाळ,,,उपचारासाठी आलेल्या एका महिला शिक्षकाच्या बॅगमधील तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने असलेली छोटी पर्स एका महिलेने हातचलाखी करून लांबवली.ही घटना शनिवार, 8 रोजी संध्याकाळच्या सुमारास शहरातील डॉ. बाहेती रुग्णालय परिसरात घडली. रविवार, 9 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता, एक संशयित महिला पर्स लांबवत असल्याचे निदर्शनास आलेे.

मारेगाव शहरातील चिकटे लेआऊटमध्ये रजनी विठोबा तेलरांदे राहतात. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. शनिवारी सकाळी रजनी या त्यांच्या मुलीसोबत यवतमाळातील चिंतावार रुग्णालयात उपचाराकरिता आल्या होत्या. चिंतावार रुग्णालयात रुग्णांची गर्दी होती. त्यामुळे तपासणीकरिता त्यांना संध्याकाळी 6 चा वेळ देण्यात आला होता. मात्र, दातांचा त्रास वाढत असल्याने रजनी तेलरांदे शहरातील पूनम चौक परिसरातील डॉ. बाहेती रुग्णालयात दुपारी 3 च्या सुमारास आल्या होत्या. तपासणीनंतर रुग्णालयातून बाहेर येताना एका संशयित महिलेने त्यांच्याजवळ येऊन हातचलाखीने त्यांच्या बॅगमधील 17 तोळे सोन्याचे दागिने असलेली लहान पर्स लांबविली.

ही बाब रजनी तेलरांदे यांना मारेगाव येथे घरी गेल्यावर लक्षात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वप्रथम त्यांनी स्वत:च्या घरातच शोध घेतला. मात्र, दागिने ठेवून असलेली छोटी पर्स कुठेच आढळून आली नव्हती. दुसर्‍या दिवशी रविवार, 9 जानेवारी रोजी सकाळी तेलरांदे यांनी मुलीसह परत यवतमाळ गाठले. त्यानंतर डॉ. चिंतावार यांच्या रुग्णालयात विचारपूस केली. तसेच याबाबत अवधूतवाडी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी कर्मचार्‍यांसह डॉ. चिंतावार रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. मात्र, त्यात असा कुठलाही प्रकार आढळून आला नाही. त्यामुळे प्रकरण शहर पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या डॉ. बाहेती रुग्णालयाकडे गेले.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि अवधूतवाडीतील कर्मचार्‍यांनी डॉ. बाहेती रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. ज्यात एक महिला बॅगमधील पर्स हातचलाखीने काढताना आढळली आहे. त्यानंतर रजनी तेलरांदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.भरदिवसा एका महिलेच्या बॅगमधून जवळपास 8 लाख 50 हजार रुपयांचे, 17 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा, एसडीपीओ पथक आणि शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान आहे. शहरात हातचलाखीने महिलांचे दागिने, रोख लंपास केल्याप्रकरणी अनेक तक्रारी यवतमाळ शहर आणि अवधूतवाडी पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. अनेकदा पोलिसांनी सराईत महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बर्‍यापैकी मुद्देमाल जप्त केला आहे. आता या 17 तोळे सोने लंपास प्रकरणी पोलिसांची सराईत महिलांची धरपकड सुरू आहे.

'त्या' महिलेचे होते लक्ष

बाहेती रुग्णालयातून रजनी तेलरांदे बाहेर निघत होत्या. त्यावेळी संबंधित महिला त्यांच्या पर्समध्ये हात टाकत होती. ही बाब त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेच्या लक्षात आली होती. मात्र, ती त्यांच्यासोबतचीच आहे, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्या महिलेने आरडाओरड केली नाही. अन्यथा तेव्हाच या घटनेचे बिंग फुटले असते.

Updated : 10 Jan 2022 6:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top