एसटी बसने प्रवास करतांना एका प्रवासी महिलेचे १२ तोळ्याचे दागदागिने चोरट्यांनी उडविले
Thieves stole 12 tola jewelery of a woman passenger while traveling in ST bus
X
वर्धा जिल्हा संपादक
मोहम्मद इकबाल पहेलवान
हिंगणघाट दि.३१ जुलै
एसटी बसने प्रवास करतांना एका प्रवासी महिलेचे १२ तोळ्याचे दागदागिने चोरट्यांनी उडविले असल्याची घटना आज दुपारी हिंगणघाट बसस्थानकात घडली.
ही महिला हिंगणघाट येथील हनुमान वार्ड येथील रहिवासी असून अहेरी-वर्धा बस क्र.एम एच-४०-५५०८ या बसने हिंगणघाट येथून वर्धा येथे निघाली होती,येथून धोत्राजवळ बस पोचली असता सदर महिलेच्या दागिने गहाळ झाल्याचे लक्षात आले.
हिंगणघाट बसस्थानकावरुन चढलेल्या दोन महिला चोरट्यांनी हा जवळपास ६ लाख,१२ हजार किंमतीचा ऐवज पळविला असल्याचा संशय आहे.
सदर प्रवासी महिलेच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने परत येऊन हिंगणघाट तिचे बॅगेतुन १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत दिली.
पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरविली परंतु वृत्त लिहिपर्यंत दागिण्याचा किंवा चोरट्यांचा सुगावा लागला नाही.