ज्वेलर्सचं दुकान फोडून १०-१५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला, घटना CCTV मध्ये कैद
Thieves break into jewelers' shop and snatch goods worth Rs 10-15 lakh, incident captured on CCTV
X
फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यामध्ये चोरींच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असुन पोलिसप्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे दिसते.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात आज पहाटे दोन चोरट्यांनी ज्वेलर्सचं दुकान फोडून १० ते १५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारंजा शहरातील जितेंद्र ज्वेलर्समध्ये दि.११ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजता हा दरोडा पडला आहे.दि.११नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजता दोन चोरट्यांनी कारमध्ये येऊन शटरचे कुलूप व त्यामागील चॅनल गेटचे कुलूप मोठ्या कात्रीने कापून दुकानात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी दुकानाच्या आतील काउंटररच्या ड्रॉपमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.दागिने चोरल्यानंतर दोन्ही चोरट्यांनी कारमधून पलायन केलं आहे. ज्वेलर्सचे मालक कैलास हिरुळकर यांनी या घटनेबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206