Home > Crime news > सावळी सदोबा येथे २४२३९४ रूपयांची चोरी

सावळी सदोबा येथे २४२३९४ रूपयांची चोरी

(परिसरात चोरीचे सत्र सुरूच: पंधरा दिवसातील ही तिसरी चोरी)

सावळी सदोबा येथे २४२३९४ रूपयांची चोरी
X

सावळी सदोबा:- पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व नेहमीच चर्चेत राहणाऱ्या,सावळी सदोबा परीसरामध्ये मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरू असून, शुक्रवार मध्यरात्री सावळी सदोबा येथील चिंतामणी-ले-आउटमध्ये ही चोरीची घटना घडली,पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे,सावळी सदोबा येथील नुनेश्वर आडे हे रात्री आपल्या कुटुंबासोबत झोपलेले असताना,घरांचे दार उघडं ठेवलेले असताना,अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून,घरातील कपाटावर ठेवलेली चावी घेऊन कपाटामधील सोन्याचे दागिने गळ्यातील पोत,चैन,अंगठीसह सोन्याचे दागिने आणि ६००० हजार रुपयासह एकुण २४२३९४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सह पोलीस निरीक्षक गजानन गजभारे करीत आहे,मागील पंधरा दिवसांतील ही तिसरी चोरी झाली असल्याचे समजते.

नागरिकांनी रात्री झोपताना आपल्या घरांचे दार व खिडक्या लावून झोपावे अशा सूचना केल्या.

गजानन गजभारे सपोनि पोलीस दूरक्षेत्र सावळी सदोबा

Updated : 3 Sep 2022 7:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top