Home > Crime news > तालुक्यातील वडनेर येथे एका सोनेचांदी दुकानामधे जवळपास ३ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी

तालुक्यातील वडनेर येथे एका सोनेचांदी दुकानामधे जवळपास ३ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी

Theft of jewelery worth around Rs 3 lakh from a gold and silver shop at Wadner in the taluka

तालुक्यातील वडनेर येथे एका सोनेचांदी दुकानामधे जवळपास ३ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी
X

हिंगणघाट दि.९ जुलै

तालुक्यातील वडनेर येथे एका सोनेचांदी दुकानामधे जवळपास ३ लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली असून जवळच असलेल्या मेडिकल शॉपमधुन चोरट्यांनी अंदाजे ५ हजार रुपये लांबविल्याची घटना काल मध्यरात्री घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

वडनेर येथील ऐन बाजारओळीत असलेल्या गुरुश्री ज्वेलर्स तसेच श्रीराम मेडिकल येथे या दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना अलीकडे वडनेर येथे प्रथमच घडली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमधे दहशत पसरली आहे.

सदर प्रकरणी पोलिस तपास सुरु असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

सदर ज्वेलरी शॉपचे हे नागपुरे यांचे असून मेडिकल शॉप हे चंद्रकांत अरोरा यांच्या मालकीचे आहे.

आज सकाळी गावकरी तेथून या दुकानासमोरुन जात असतांना संबंधित दुकानाचे शटर्स वाकवलेल्या परिस्थितित दिसुन आले,यामुळे सदर बाब संबंधितांना कळविण्यात आली,

चोरी झाल्याची शंका येताच दुकानमालकांनी पोलिसांत तक्रार नोंद केली.

पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोनपितळे हे करीत आहेत.

Updated : 9 July 2021 9:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top