ट्रक चालकाने केली गुरु लक्ष्मी कंपनीची 35 लाख 56 हजार 187 रुपयांची फसवणूक
The truck driver cheated Guru Lakshmi Company of 35 lakh 56 thousand 187 rupees
X
यवतमाळ शहरालगत असलेल्या असलेल्या नागपूर बायपास जवळ गुरु लक्ष्मी कंपनी येथे फिर्यादी अभय बन्सीधर वर्मा वय 30 वर्ष रा. अमरावती रोड जे पी शाळेजवळ नागपूर हा वाहतूक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत असून आरोपी गुलफान वलद मेहंदी हसन वय 30 वर्ष रा. ऊस्क, जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हा फिर्यादी कडे वाहनचालक म्हणून ट्रक वाहन क्रमांक एम.एच 40 ए.के 2069 मध्ये गुरु लक्ष्मी कंपनीमधुन 245 बॅग कॉटन यार्न (धागा) किं.28,56,187 रु. भरून गुजरात प्रांतातील श्याम पाॅलीस्पिन प्रायव्हेट लिमिटेड साकर आश्रम रोड अहमदाबाद येथे पोहोचून देण्याकरिता निघाला असता आरोपी हा दिनांक 7 जानेवारी 2022 पर्यंत फिर्यादी अभय वर्मा यांच्या संपर्कात होता मात्र त्यानंतर दिनांक 28 जानेवारी 2022 नंतर त्याच्याशी संपर्क न झाल्याने व इतरत्र शोध घेतला व मिळून आल्यामुळे आरोपी हा
फिर्यादीच्या ट्रक वाहन किंमत 7 लाख रुपये व 245 बॅग कॉटन यार्न (धागा) किं.28,56,187 रु असा एकूण 35,56,187 रु. मुद्दे मालाची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी अभय वर्मा याने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी गुलफान वलद मेहंदी हसन याचे विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये भादंवि कलम 406 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे.