लॉकरमधून काउंटरवर ठेवलेल्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला
1 लाख 54 हजार 680 रुपये घेऊन चोरटा पसार,
X
दि.18 सप्टें उमरखेड शहरातील सारडा पेट्रोल पंप येथील कॅबिन मध्ये पेट्रोल विक्रीचे जमा झालेले पैसे बँकेत भरासाठी काउंटरवर ठेवले असता.चोरट्याने कॅबिनमध्ये येऊन काउंटरवर ठेवलेल्या पैशावर डल्ला मारुन चोरून नेल्याची घटना दि 15 सप्टेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार यातील माधव कैलास व्यास वय 48 वर्ष रा गोचर स्वामी वार्ड उमरखेड हे उमरखेड येथील सारडा पेट्रोल पम्प येथे मॅनेजर पदाचे काम व आर्थिक देवाण घेवाण चे काम पाहते,त्यामुळे दि 15 सप्टेंबर रोजी माधव व्यास यांच्या कॅबिनमध्ये पेट्रोल विक्रीचे जमा झालेले 1 लाख 54 हजार 680 रुपये हिरव्या कलरच्या थैलीत लॉकर मधून काढून एस बी आय बँक उमरखेड मध्ये जमा करण्यासाठी काउंटरवर ठेवले असता.
तेवढ्यात एक अनोळखी मुलगा काउंटर जवळ आला व माधव व्यास यांना म्हणाला की तुमच्या टेबलाच्या बाजूला पैसे पडून आहे.ते उचलून घ्या असे म्हणता माधव व्यास हा टेबलच्या बाजूला पैसे पाहण्यासाठी वाकला असता तेव्हा आरोपी लंकेश बाबूभाई वय 27 वर्ष रा औरंगाबाद यांचे सोबत दुसरा अनोळखी मुलगा टेबल जवळ आला व त्याने काउंटरवर ठेवलेल्या थैलीतील पैसे उचलून चोरून नेले.
व महागाव रोडने पळाला,याप्रकरणी माधव व्यास यांनी दि 16 सप्टेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास उमरखेड पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी आरोपीवर सदरचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दि 18 सप्टेंबर रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे,या घटनेचा पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन करीत आहे.