मुलाने केला बापाचा खून
The son killed the father
M Marathi News Network | 2 Aug 2021 12:02 PM GMT
X
X
पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी खुर्द येथील रहिवासी पुंजाजी हर्सुजी दीपके वय ४५ वर्ष रा बोरी खुर्द हे आपल्या मुलीस माहेरी जा असे सांगून वाद निर्माण करीत असल्याने काल रात्री सात वाजता चे दरम्यान पुंजाजी हरसुजी दिपके हे नेहमी प्रमाणे वाद करीत असताना रागाच्या भरात पूंजाजी दिपके यांचा 15 वर्षीय मुलगा यांनी लाकडी काठीने डोक्यावर व अंगावर वार केल्याने पुंजाजी दिपके गंभीर जखमी झाले त्यांना येथील खाजगी दवाखान्यात भरती केले असता रात्री पूंजाजी दिपके यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार सिताराम हरसुजी दिपके वय पन्नास वर्ष यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनला दिली असता विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Updated : 2 Aug 2021 12:02 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire