Home > Crime news > शिरपुर पोलीसांची एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

शिरपुर पोलीसांची एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

The second major operation of Shirpur police in one week

शिरपुर पोलीसांची एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई
X

तालुक्यातील पिंपरी जंगलातील कोंबड बाजारावर धाड टाकुन लाखोंचा मुद्देमाल जप्त

शिरपुर पोलीसांची एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंपरी जंगलात धाड टाकुन लाखोंचा मुद्देमाल जप्त करुन ,एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाई करुन, संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिरपूर पोलीस स्टेशनची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.सविस्तर वृत्त असे की, ठाणेदार गजानन करवडे यांना गोपनीय सुत्रांकडुन दुपारच्या सुमार माहीती मिळाली की ,शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पिंपरी गावा जवळील घनदाट बाबुळवनात, कोंबड्याच्या झुंझीवर पैशाचा जुगार खेळल्या जात आहे.गुप्त माहित प्राप्त होताच ठाणेदार करेवाडे यांनी सापळा रचुन ,साध्या वेश्यात ठाणेदार करवाडे

व ईतर कर्मचारी यांनी दबा धरुन गोल रिंगण करुन ,झुंजीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनवर ,वेगवेगळ्या दिशेने छापे टाकून ,आठ लोकांना ताब्यात घेतले.यामध्ये राकेश महादेव महाकुलकार (२९) रा.पठारपुर ता.वणी , राजु पुरुषोत्तम पिंपळकार (३९) रा.पठारपुर , हर्षल आनंदराव कळसकर(१९) रा.सैदावाद , बंडु शेषेराव गेडाम वय (५०) रा.पिंपरी , परसराम बळीराम ढेंगळे(५८) , विठठल मारोतो गिरसावळे (४०) रा.बाबापुर , सुधीर गजानन पाचभाई (३६) रा.अडेगांव, देवानंद आनंद मोकासे(५७) रा.साफल्य नगरी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.सोबतच खेळविण्यात येणारे कोंबडे व आरोपींची दुचाकी घटनास्थळावरुन

एकुण २,००,९५०/ रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करुन आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मा.अपर पोलीस अधीक्षक ,डॉ. खंडेराव धरणे ,मा.उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलोस निरीक्षक गजानन करेवाड, यांच्या नेतृत्वात पो.उप. रामेश्वर कांडुरे, गंगाधर घोडाम,अभीजीत कोष्टावार, प्रमोद जुनुनकर ,सुनिल दुर्वे , अमोल कोवे, राजु ईसनकर , गजानन सावसाकडे , निलेश भुसे ,विजय फुलके यांनी केली आहे.

Updated : 20 Dec 2021 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top