Home > Crime news > वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ते सर्व शिलेदार 'द रिअल हिरो'

वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ते सर्व शिलेदार 'द रिअल हिरो'

The real hero of Washim's local crime branch

वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ते सर्व शिलेदार द रिअल हिरो
X

वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ते सर्व शिलेदार 'द रिअल हिरो'

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या धमाकेदार कारवाईमुळे सामान्य जनतेने सोडला मोकळा श्वास

(फुलचंद भगत/मंगरुळपीर)

घामाचे रक्त करुन कष्टकरी आपली जमापुंजी जमा करतात व आपल्या कुंटुंबाच्या पोटापान्याची सोय लावतात परंतु लवकर श्रिमंत होन्याच्या लालसेने वाममार्गाला लागलेले नवतरुण अशा सामान्यांना लुटुन आपले खीसे भरुन ऐशआराम करन्याचे प्रमाण प्रकर्षाने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे फोफावले होते.यातच पिंपळखुटा संगम येथील अडत व्यावसायिकांना राञी घरी जात असतांना त्यांच्या डोळ्यात चटणी टाकुन जवळचे सव्वालाख रुपये पळवल्याने एकच खळबळ माजली.पोलिस विभागापुढे या वाटमारी करणारांना पकडणे हे एक मोठे आव्हान होते तसेच याआधीही असे छोटेमोटे वाटमारीचे गुन्हे जिल्हा हद्दीत घडल्याने सामान्य जनता जीव मुठीत धरुन होती.पिंपळखुटा येथील प्रकरणाने संपुर्ण पोलिस यंञणा सतर्क झाली आणी वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक यांनी सबंधित प्रकरणाकडे लक्ष वेधुन आरोपिंचा छडा लावन्याचा चंग बाधला.'द रिअल हिरो'असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठाकरे आणी त्यांच्या मावळ्यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली.तेवढ्याच राञी असेच छोटेमोटे वाटमारेचे काम करणार्‍या एकाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केली.ती संपुर्ण राञ पोलिस टिमने सामान्य जनतेला लुटणार्‍या टोळीच्या शोधात जागुन काढली,ना पाणी ना जेवण ना झोप लगेच सकाळी मंगरुळपीर पोलिस स्टेशन या टिमने गाठले.तपास करत असतांना एक धागा गवसला,पोलिसी खाक्या दाखवताच इतरही घडी ऊलगडत गेली आणी त्याआधारे पुन्हा एकएक सुञधार पकडुन जेरबंद केले.पुन्हा त्या दिवशी राञी तपास करत करत एकजन वाशिम येथे पकडुन जेरबंद केला आणी नंतरच आपल्या घरी ही पोलिस टिम गेली.तहानभुक विसरुन सामान्य जनतेच्या रक्षणासाठी व शांतता व सुव्यवस्था राखन्यासाठी वाशिमची स्थानिक गुन्हे शाखेची टिम 'द रिअल हिरो'ठरली.त्यांना पोलिस अधिक्षकासह मंगरुळपीर पोलिस विभागाचेही सहकार्य लाभले.

कमी वेळेत पैसे कमवुन हौसमौज करणारे तरुण या वाठमारीकडे आणी इतर गुन्ह्याकडे वळल्याने जनता ञस्त झाली होती अशातच तत्परतेने आपले कर्तव्य निभावून आरोपी जेरबंद केल्याने सामान्य जनतेंनी मोकळा श्वास सोडला असुन या सर्व पोलीसांचे जनता मनापासुन आभार मानत आहेत.आपले करिअर सोडुन अशा वाइट मार्गाकडे लागणार्‍या तरुणांना हा सबक असुन पुन्हा नव्याने ऊभारी घेणारे ऊद्रेकी तरुण तर आपला तंबु सोडुन पसार झाले आहेत व पोटापान्यासाठी छोटामोठा कामधंदा करन्याकडे वळले आहे.पोलिसी कचाट्यात सापडल्याने कसे आयुष्य ऊध्वस्त होते याची अशा ऊपद्रवी तरुणांना चांगलेच समजल्याने त्यांनी अशा वाईट कामामधुन काढता पाय घेतल्याचे समजते.हे सर्व श्रेय त्या पोलिस शिलेदारांना जाते ज्यांनी कुणालाही न जुमानता तसेच राजकारणी तथा बड्या हस्तींना भिक न घालता गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचुन काढले.अजुनही अशाचप्रकारचे गुन्हे घडले असल्याने आणी आणखीही आरोपींचा समावेश असल्याचे दिसत असल्याने सर्वांना जेरबंद केल्यावरच पोलिस आता शांत बसणार असल्याने सामान्यांना माञ आता शांततेचे जिवन जगायला मिळणार आहे हे विषेश.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 2020-12-24T19:27:46+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top