Home > Crime news > गुप्तधनाचा मोह, सासरी मंडळी कडून विवाहितेचा छळ

गुप्तधनाचा मोह, सासरी मंडळी कडून विवाहितेचा छळ

The lure of secret money, the persecution of a married woman by the in-laws

गुप्तधनाचा मोह, सासरी मंडळी कडून विवाहितेचा छळ
X

पांढरकवडा - अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात एका विवाहितेचा मागील अनेक दिवसांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्या जात असल्याची संतापजनक घटना केळापूर येथे उघडकीस आली आहे. सासरी मंडळी कडून केला जात असलेला छळ असहाय झाल्याने पीडितेने शुक्रवारी पांढरकवडा पोलिस स्टेशन गाठून पती सहित सासरच्या मंडळी विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पीडिता ही आर्णी तालुक्यातील भंडारी (शिवर ) येथील असून तिचा विवाह १० वर्षा अगोदर केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर सोबत रिती रिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाच्या एक ते दीड वर्षे सासरी मंडळी कडून पीडितेला चांगली वागणूक दिली गेली परंतु नंतर हुंडा न दिल्याचे कारण करून माहेरून २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. दरम्यान नणंद, नंदोई व पती कडून पीडितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू झाल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार पीडितेला माहेरून लग्नाच्या वेळी संसार नांदायला लागणारे साहित्य व लग्न खर्च म्हणून ३ लाख रुपये सुद्धा देण्यात आले होते. परंतु सासरच्या मंडळी कडून हुंडा न दिल्याचे कारण पुढे करून वेळोवेळी २ लाख रुपये आणण्याचा तगादाच लावण्यात येत असे. दरम्यानच्या काळात पती व सासरी मंडळीला गुप्तधन मिळविण्याचे वेळ लागल्याने त्यांनी अनेक वेळा तिच्यावर मांत्रिक प्रयोग केल्याचे तिचे म्हणणे आहे. गुप्तधन च्या लालचे पाई पीडितेला अंगारा लावणे, हार टाकने, व जडीबुटी चे औषध देऊन तिला जीव मारण्याचा प्रयत्न केल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ह्या सर्व प्रकारचा विरोध केला असता पीडितेला धमकविण्या येत असल्याने ती हे सर्व सहन करीत होती. दिवसेदिवस हा छळ वाढतच चालल्याने पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या आई, बाबा व माहेरच्यांना सांगितले असता काही दिवसा अगोदर पीडितेला माहेरच्यांनी घरी नेले. आज ३ जून शुक्रवारी पीडितेने पांढरकवडा पोलिस स्टेशनला ह्या सर्व प्रकार संबंधी पती प्रवीण शेगर, सासरे गोविंदराव शेगर, सासू कमलाबाई शेगर, दिर अरविंद शेगर, नंदोई प्रकाश झरेकर, नणंद पुष्पाबाई झरेकर विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. एकीकडे विज्ञानाच्या या युगात माणूस अंधश्रद्धा निर्मूलनावर भर देत असताना दुसरी कडे मात्र समाजात घडणाऱ्या अश्या घटनेमुळे अंधश्रद्धेने किती पाय रोवले आहे हे लक्ष्यात येते.
Updated : 3 Jun 2022 7:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top