Home > Crime news > घरमालकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

घरमालकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

The landlord molested the student

घरमालकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
X

यवतमाळ - भाड्याने राहत असलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीला घरमालकाने भाड्याच्या पैशासाठी तगादा लावत तिचा विनयभंग केला. ही घटना शहरातील महेश भवन परिसरात असलेल्या पवनसुत अपार्टमेंटमध्ये गुरूवार, दि. २४ मार्चला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने थेट अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संजय उपगनलावार वय ४५ वर्ष रा. माईंदे चौक या घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Updated : 26 March 2022 8:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top