Home > Crime news > सुपारी बहाद्दर पोलिसांच्या अडक्यात शेगावच्या लॅब चालकावर केला होता हल्ला.

सुपारी बहाद्दर पोलिसांच्या अडक्यात शेगावच्या लॅब चालकावर केला होता हल्ला.

The lab driver of Shegaon was attacked by Supari Bahadur police.

सुपारी बहाद्दर पोलिसांच्या अडक्यात शेगावच्या लॅब चालकावर केला होता हल्ला.
X

शेगाव: तुझी सुपारी घेतल्याचे सांगून खाजगी लेप चालकावर हल्ला करुन लुटणाऱ्या अखेर पकडण्यात यश आले आहे शेगाव शहर पोलिसांनी त्याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून शेगाव मध्ये आणले आहे त्याच्याकडून शेगाव मध्ये घडलेल्या आणखीन गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.

मंगेश चिंतामण देवकर (रा. शिवाजी नगर शेगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे श्रीकृष्ण त्र्यंबक घोगले या खाजगी लॅब चालकाला त्याने साथीदारांसह मिळून लुटले ते 21 जून ला रात्री पावणे नऊच्या सुमारास बाळापुर रोडवरील शेतात असतानाही लूटमार व हल्ला घोगले यांच्यावर झाला होता. त्यांच्या डोक्यात दगड घालून पॅन्टच्या खिशातील दहा हजार रुपये काढून हल्लेखोरांनी पळ काढला होता या प्रकरण शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती मंगेश हा अकोल्यातील संशयास्पद रित्या फिरताना खदान पोलिसांनी ताब्यात घेतला होता त्याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासकामी ताब्यात घेतले होते.

घोगले यांच्यावर हल्ला करणाराही त्याच वर्णनाचा असल्याने पोलिस उपनिरीक्षक नितिष कुमार इंगोले पो ना श्री वावेकर श्री बोरसे यांचे पथक ठाणेदार संतोष ताले यांच्या आदेशाने अकोला येथे गेले त्यांनी मंगेश ची चौकशी केली असता त्याने गोगले यांच्यावर हल्ला केल्याचे कबूल केले साथीदार महेश करोडदे (रा. अंबासी) यांच्या सोबत मिळून त्याने हा गुन्हा केला होता मंगेशला ताब्यात घेऊन पोलीस शेगावला परतले त्याला न्यायालयात हजर केले असता ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली त्यांच्या चौकशीतून आणखीन काही गुन्हे समोर येऊ शकतात अशी शक्यता आहे ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे पोलीस उपनिरीक्षक नितीन कुमार इंगोले ए एस आय लक्ष्‍मण मिरगे पो. ना. गणेश वाकेकर पो.ना. राहुल पांडे पो.ना. उमेश बोरसे पो. काँ. बारवाल यांनी केली.

झेड.ए. खान

Updated : 7 July 2021 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top