कुख्यात नराधम बागा उर्फ अक्षय शरद बगमारे याने केला युवतीवर सतत अत्याचार
"हि युवती ठरली बागाची तिसरी शिकार"
X
यवतमाळ दि.१७ ऑक्टोबर : एका नराधमाने बहिणीच्या परिसरातच राहत असलेल्या एका १९ वर्षीय युवतीवर सतत अत्याचार केल्याची ह्रदयद्रावक घटना दि.१४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन वाजता विवेकानंद सोसायटीत मध्ये घडली.
सुरक्षारक्षक असलेले वडील रात्रपाळीदरम्यान कर्तव्यावर गेले असता घरात कुणी नसल्याची संधी साधून मैत्रिणीच्या भावानेच तरुणीवर अत्याचार केला.ही घटना दुसऱ्या दिवशी दि. १५ ऑक्टोबर विवेकानंद सोसायटी जामनकर नगर परिसरात उघडकीस आली.
अक्षय उर्फ बागा शरद बगमारे (२३) रा.जामनकर नगर असे अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पीडित तरुणीने याप्रकरणी अवधूत वाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.त्यावरून पीडित तरुणी ही गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ येथे राहते.
त्याने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जिवघेणी मारहाण केली. नंतर घरी आणून सोडून दिले. शुक्रवारी सकाळी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अक्षय शरद बगमारे उर्फ बागा (२५) रा. जामनकर नगर असे नराधमाचे नाव आहे.अक्षयने अल्पवयीन असतानाच गंभीर गुन्हे केले आहे.यवतमाळातील अक्षय राठोड टोळीच्या तो सतत संपर्कात असायचा.त्याच्या बहिणीची मैत्रिण असलेल्या मुलीलाच त्याने
आपल्या वासनेची शिकार बनविले.घरात आईचा कॅन्सरने मृत्यू झालेला त्याच धसक्यात मोठी बहीणही दगावली.
वडील व ती असे दोघेच घरी राहात होते.याचाच फायदा घेऊन आरोपी अक्षयने तिला वडिलांना ठार करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन-तीनवेळा बळजबरी केली.गुरुवारी रात्री २ वाजता अक्षय तिच्या घरी पोहोचला.तेव्हा तो दारूच्या नशेतच होता.त्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी केली.नंतर तिला बेशुद्ध केले.तेथून तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला.त्याठिकाणी दोन साथीदारांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या वडिलाने पोलीस नातेवाइकाच्या मदतीने धीर देत विचारपूस केली. तेव्हा अक्षय बगमारे याने हे कृत्य केल्याचे सांगितले. शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अवधूतवाडी पोलीसांनी पीडितेच्या जबाबावरून अक्षय शरद बगमारे उर्फ बागा याच्यावर ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पसार झाले असून अवधूतवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
हाच तो नराधम बागा उर्फ अक्षय शरद बगमारे
नराधम बागाने केली अनुसूचित जातीतील हि युवती तिसरी शिकार
परिसरात लिंगपिसाट या नावाने कुप्रसिध्द असलेल्या ह्या कुख्यात नराधम बागाने या पुर्वी अशा अनेक घटना केल्या.मुलींना आपल्या प्रेमाच्या पाशात ओढणे व नंतर शस्त्रांचा धाक दाखवून अत्याचार करणे हे प्रसंग त्याने यापूर्वी परिसरातील दोन अनुसूचित जातीतील मुलींसोबत केले.मात्र भीतीपोटी त्या मुलींकडून व पालकांकडून तक्रारच न केल्याने प्रकार उघडकीस येऊ शकला नाही.त्यामुळे या नराधम बागाची हिम्मत वाढतच गेली.
त्याचे हे गंभीर प्रकार परिसरात सर्वश्रृत आहे मात्र हा गुंडप्रवृत्तीचा असल्याने आज पर्यंत कोणीही तक्रार करण्याची हिम्मत केली नाही.त्याचेवर अनेक गुन्हे नोंद आहे.