यवतमाळ बाभूळगाव रोडवरील घटना युवकास ट्रकने चिरडले
The incident on Yavatmal Babhulgaon Road crushed the youth by truck
X
रोडच्या पट्ट्याच्या कामाचा फोटो घेण्यासाठी येणाऱ्या युवकास मागील येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 5 जुलैइ रोजी सकळी 11 वाजता सुमारास बाभूळगाव बसस्थानकाच्या 300 मीटर अनंतराव यवतमाळ रोडवरील कॅनल जवळ घडली.
रणजित केशवराव यादव 38 वर्षे रा बाजोरीया नगर यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे.
मृतक रणजित यादव हा विनीत रेफलेक्टीन यांच्या कामावर होता यवतमाळ धामणगाव वर रोडचे पट्टे झालेल्या कामाच्या फोटो काढण्या करीता आला होता.फोटो काढीत असतांना धामणगाव वरून यवतमाळ कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH29/M0266 या ट्रकने मृतक रंजितला धडक दिल्याने तो चिरडल्या गेला व तो जागीच ठार झाला.
मृतक रणजित चे सहा महिन्या अगोदर लग्न झाले होते .आई,वडील,पत्नी असा परिवार आहे. सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी करून ट्रक ताब्यात घेतला .वृत्त लिहे पर्यंत ट्रॅक चालकास ताब्यात घेतले नव्हते.