Home > Crime news > कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी डी. बी. पथकाने अटक करून मुद्देमाल जप्त..

कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी डी. बी. पथकाने अटक करून मुद्देमाल जप्त..

The gang that stole the iron plate of Kolhapuri dam d. B. Squad arrested and confiscated ..

कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी डी. बी. पथकाने अटक करून  मुद्देमाल जप्त..
Xहिंगणघाट दि. १३ / या प्रमाणे आहे की, आरोपी नामे 1) मनोज देवीदासजी मंगाम, वय 23 वर्ष, रा. आमगाव (खडकी), पो. स्टे. सिंदी (रेल्वे). 2) सरफराज हबीब शेख, वय 23 वर्ष, रा. क्रांती चौक, वार्ड नं. 4 बुटीबोरी, जि. नागपूर, 3) अय्युब वहीद खान, वय 21 वर्ष, रा. क्रांती चौक, वार्ड नं. 4 बुट्टीबोरी, जि. नागपूर यांचेवर नांदगांव चौक, हिंगणघाट येथे नाकाबंदी करून चेक केले असता, त्याचे ताब्यात एक विना नंबरचा नविन महेन्द्रा कंपनीचा बोलेरो पिकअप मध्ये 23 नग कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा प्रती प्लेट 3000 रू. प्रमाणे 69,000 रू. भरून असल्याचे आढळून आले. त्यांना बंधाऱ्याच्या प्लेटाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली व प्लेटाबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. म्हणून सदरच्या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा या त्यांनी कोठल्या तरी कोल्हापूरी बंधाऱ्यावरून चोरून आणली असावी, व त्या चोरीची आहे, असे आढळून आल्याने त्याचे विरूध्द पो. स्टे. हिंगणघाट येथे इस्तेगासा क्र. 01/2022 कलम 41 (1) (ड) फौ.प्र.सं. अन्वये नोंद करून त्याचे ताब्यातुन बोलेरो पिकअप व 23 नग बंधाऱ्याच्या लोखंडी

प्लेटा असा एकुण 8,69,000 रू. चा माल जप्त केला. सदर जप्त कोल्हापूरी बंधाऱ्याच्या प्लेटाबाबत त्यांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी मौजा सिंदीविहीरी, पोलीस स्टेशन कारंजा येथील शासकिय कोल्हापूरी बंधाऱ्याच्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने व पो. स्टे. कारंजा येथे अप. क्र. 103 / 2022 कलम 379 मा.दं.वि. नोंद असल्याचे दिसुन आले असुन, पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

Updated : 13 April 2022 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top